महाबळेश्वरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे ; 'महाबळेश्वर टाईम्स'कडून शुभेच्छा
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर: महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे लोकप्रिय आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील शिंदे यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या विशेष दिनाचे औचित्य साधून 'महाबळेश्वर टाईम्स'चे संपादक राहुल शेलार व कार्यकारी संपादक रियाज मुजावर यांनी नगराध्यक्षांना प्रत्यक्ष भेटून व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना संपादक राहुल शेलार म्हणाले की, "सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर शहराचा चेहरामोहरा बदलत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा." तर कार्यकारी संपादक रियाज मुजावर यांनी, "नगराध्यक्षांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून त्यांना उदंड आयुष्य लाभो," अशी भावना व्यक्त केली.
वाढदिवसानिमित्त आज सकाळपासूनच सुनील शिंदे यांच्या निवासस्थानी व नगरपालिकेत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.


Social Plugin