महाबळेश्वरच्या अद्यावत दिवाणी व फौजदारी न्यायालय इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न*
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर ( प्रतिनिधी)
महाबळेश्वर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नवीन अद्यावत इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे याच्या हस्ते उपनगराध्यक्ष नासिर भाई मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. या नवीन इमारतीमुळे महाबळेश्वर मधील न्यायालयाचा अनेक वर्षांचा प्रलंबित प्रश्न आता कायमस्वरूपी सुटला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाबळेश्वर मध्ये न्यायालयाची सोय व्हावी, अशी मागणी होती. २०१० पासून येथे कोर्टाची निर्मिती झाली असली, तरी न्यायालयासाठी हक्काची आणि सोयीस्कर अशी स्वतंत्र इमारत उपलब्ध नव्हती. ही गरज ओळखून महाबळेश्वर नगरपालिकेने पुढाकार घेतला आणि पालिकेच्या मालकीची असलेली पोलीस ग्राऊंड शेजारील इमारत न्यायालयासाठी देण्याचा मानस व्यक्त केला
या जुन्या इमारतीचे पूर्णपणे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करून आता एका अद्यावत आणि सुंदर इमारतीत न्यायालयाचे कामकाज सुरू होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी स्थानिक पदाधिकारी, वकील संघटनेचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—🙏 ॲड. संजय जंगम (गटनेते, नगरसेवक महाबळेश्वर नगरपालिका)🙏
अँड संजय जंगम⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️⬅️↖️↖️↖️↖️
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485





Social Plugin