🏏 चेतक क्रिकेट संघाच्या वतीने पोलो ग्राउंड येथे स्वच्छता
मोहीमेचे आयोजन .
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर पोलो ग्राउंड येथे भव्य क्रिकेटचे सामने भरवले जातात ते पाहण्यायाकरिता अनेक क्रिकेट प्रेमी येत असतात
गेल्या काही दिवसांपासून पोलो ग्राउंड वर कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले होते या ठिकाणी प्लास्टिक चा ढीग साचला होता हे चेतक क्रिकेट संघच्या निदर्शनास आले. स्वच्छता हे आपले प्रथम कर्तव्य आहे या भावनेने
चेतक संघाच्या सभासदांच्या वतीने निर्णय घेण्यात आला की दिनांक 4 मे सोमवार सकाळी 9 वजता आपल्या चेतक संघाच्या वतीने साफसफाईचे मोहिम हाती घेण्यात आली पोलो ग्राउंड येथील प्लास्टिक व कचरा गोळा करून स्वच्छतेला हातभार लावला आहे. या वेळी संघ कर्णधार अक्षय अनिल सपकाळ
उपकर्णधार.
ऋषिकेश दिलीप चिकने.
संघातील खेळाडू.
अनिकेत भिमा मोरे
सूरज सुरेश सपकाळ
मोहम्मदमाज नासिर वारूणकर व इतर सभासदांनी या साफसफाई मोहीम मध्ये सहभाग घेतला होता या मोहिमेकरिता त्यांना नगरपालिकेचे सहकार्य लाभले


Social Plugin