Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमधील विजयाचा महाबळेश्वरमध्ये जल्लोष ; भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिशबाजी.....

 पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरीमधील विजयाचा महाबळेश्वरमध्ये जल्लोष ; भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिशबाजी.....




महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर : प्रतिनिधी

पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि एन.डी.ए. आघाडीला मिळालेल्या देदीप्यमान यशाचे पडसाद महाबळेश्वरमध्ये उमटले आहेत. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी महाबळेश्वर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाक्यांची आतिशबाजी आणि घोषणाबाजी करत मोठा जल्लोष करण्यात आला.


​राज्यातील आणि देशातील राजकीय वातावरणाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकांमध्ये भाजपाने मिळवलेले यश कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचे ठरले आहे. महाबळेश्वर येथील मुख्य बाजारपेठ आणि सुभाष चौक परिसरात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नरेंद्र मोदी झिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद व्यक्त केला. आसाममध्ये सत्ता राखल्याबद्दल आणि पुद्दुचेरीसह पश्चिम बंगालमधील वाढलेल्या प्रभावाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. हा विजय विकासकामांची पावती असल्याची भावना यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

​या जल्लोष कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष डी एम बावळेकर, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, विजय भिलारे, शहराध्यक्ष प्रशांत भोईटे, नंदकुमार बावळेकर, सनी मोरे, राजेंद्र पवार,गोपाळ लालबेग,श्री धोत्रे,ओंकार दिक्षित, चिन्मय आगरकर,सनी उगले,बंटी शेटे, प्रसाद काळे, प्रसाद डांगे तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते. फटाक्यांच्या आवाजाने आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाने महाबळेश्वरचे वातावरण भाजपमय झाले होते.


           बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                  संपादक :- राहुल शेलार 

                     📱 9765576377

         कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                    📱 9403546 485