Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर बस स्थानकावर ट्रॅफिक इन्स्पेक्टरची प्रवाशांसह पत्रकारांशी हुज्जत; मुजोर अधिकारी 'खान' याच्या निषेधार्थ महाबळेश्वरमध्ये भव्य रॅली

महाबळेश्वर बस स्थानकावर ट्रॅफिक इन्स्पेक्टरची प्रवाशांसह पत्रकाराशी हुज्जत; मुजोर अधिकारी 'खान' याच्या निषेधार्थ महाबळेश्वरमध्ये पत्रकारांची निषेध रॅली.....

निषेध रॅलीची दखल घेऊन परिवहन महामंडळाने केले शाहरुख खान यांचे निलंबन


महाबळेश्वर टाईम्स 
महाबळेश्वर : प्रतिनिधी 
महाबळेश्वर येथील मध्यवर्ती बस स्थानकावर  वाहतूक निरीक्षक शाहरुख खान(ट्रॅफिक इन्स्पेक्टर) प्रवाशांशी अरेरावी करत मोठा गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या स्थानिक पत्रकारांनाही संबंधित मुजोर अधिकारी शाहरुख खान याने अर्वाच्य भाषेत हुज्जत घातली. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या या मुजोर अधिकाऱ्याचा महाबळेश्वरमध्ये भव्य रॅली काढून जाहीर निषेध करण्यात आला. या रॅलीची परिवहन महामंडळने गंभीर दखल घेऊन खानचे  तडकाफडकी निलंबन करण्यात आले.

या निषेध रॅलीमध्ये महाबळेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश काका पल्लोड, विलास काळे ,संजय दस्तुरे, अजित जाधव ,सचिन शिर्के, प्रेषित गांधी, अजित कुंभारदरे,  महाराष्ट्र पत्रकार संघाचे राहुल शेलार, रियाज मुजावर, संदेश भिसे, सह्याद्री पत्रकार संघाचे संदीप भाऊ देवकुळे, शरद झावरे, तसेच जितेंद्र कारंडे राजेश सोंडकर,  मिलिंद काळे,  पंचायत समिती सदस्य संजय शेलार, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, शिवसेना शहर प्रमुख ( उ.बा.ठा) राजेश गुजर, सचिन गुजर, शंकर ढेबे, वर्षा  आरडे, मेघा चोरगे, गोपाल लालबेग, राजेश पंडित, तात्या साळुंखे, मनोज ताथवडेकर, वंचीत बहुजन आघाडी अध्यक्ष उत्तम भालेराव, आर पी आय आठवले गटाचे शहर प्रमुख विनय गायकवाड, दिपक वरपे, सचिन उगले,विविध पक्षांचे व संघटना चे पदाधिकारी उपस्थित होते.
 
महाबळेश्वर पत्रकार संघांचा तीव्र संताप आणि दणका

हा प्रकार समोर येताच सातारा जिल्हा पत्रकार संघाने अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा अशा प्रकारे जाहीर अपमान करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका संघाने घेतली. पत्रकार संघाच्या या तीव्र विरोधामुळे आणि दबावामुळे प्रशासनाला अखेर नमते घ्यावे लागले.
 
एसटी महामंडळाच्या सातारा विभाग नियंत्रकांनी या घटनेची गंभीर दखल घेत सदर प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे म्हटले आहे. महामंडळाची प्रतिमा मलिन करणाऱ्या वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

या कारवाईसोबतच, सातारा विभागातील सर्वच एसटी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रवाशांशी तसेच पत्रकार बांधवांशी अत्यंत सौजन्याने आणि आदराने वागण्याच्या कडक सूचना विभाग नियंत्रकांनी दिल्या आहेत. यापुढे असा उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

पत्रकार संघाच्या एकजुटीमुळे आणि आक्रमक भूमिकेमुळे महामंडळाला अवघ्या २४ तासांत श्री. खान यांच्यावर कारवाई करावी  झाल्याने   या 'दणक्याची' सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.


         बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
                 संपादक :- राहुल शेलार 
                   📱 9765576377
            कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 
                   📱 9403546 485