महाबळेश्वरच्या वेण्णा तलावात रबर बोट व ओबीएम मशीनचे लोकार्पण
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाबळेश्वर ट्रेकर्सला वितरित ; वेण्णा तलावात नवीन बोटीचा सराव
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
''आघातातून आधाराकडे'' हे ब्रीद घेऊन आपत्ती काळात विनामूल्य कार्य करणाऱ्या व शेकडो बचावकार्यात आघाडीवर असलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्स संस्थेस सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून नवीन अद्ययावत अशी रबर बोट व ओबीएम मशीन देण्यात आले असून पाण्यामध्ये पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवणे, पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे,आणि अत्यावश्यक मदत पोहोचवणे यासाठी उपयुक्त असलेल्या या बोटीचे लोकार्पण वेण्णालेक येथे नवनियुक्त पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या हस्ते पूजन करून नारळ वाढवून करण्यात आले.
यावेळी महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य व नगरसेवक कुमार शिंदे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख देविदास ताम्हाणे,सपोनि एम बी परजाने,पालिकेचे बोट क्लब अधिक्षक कल्याण हिवरे,ट्रेकर्स टीमचे अध्यक्ष अनिल केळगणे यांच्यासह ट्रेकर्स सदस्य जयवंत बिरामणे,अमित कोळी,सोमनाथ वागदरे,अक्षय नाविलकर,अनिकेत वागदरे,प्रज्वल केळगणे,आशिष बिरामणे आदींसह पालिका कर्मचारी उपस्थित होते या अद्ययावत बोटीच्या माध्यमातून वेण्णा तलावात दोन तास सराव देखील केला.
श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा सातारा जिल्हयामध्ये दि.१५/०७/२०२६ ते १८/०७/२०२६ या कालावधीत पार पडणार असून या सोहळयात लाखो भाविक व वारकरी सहभागी होत असतात सातारा जिल्हयामध्ये पालखी सोहळयाचे आगमन बुधवार दि.१५/०७/२०२६ रोजी होणार आहे. सातारा जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पादुकांचे निरा नदीमध्ये स्नान घालण्यात येते अश्यावेळी वारकरी व भाविक नीरा नदीमध्ये स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नदीमध्ये प्रवेश करतात गर्दी जास्त प्रमाणात असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून दरवर्षी नीरा नदीच्या ठिकाणी महाबळेश्वर ट्रेकर्स रेस्क्यू टीमला जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून बोलाविण्यात येते यंदा देखील महाबळेश्वर ट्रेकर्स टीम नीरा नदी येथे तैनात असणार असून या नवीन रबर बोट व ओबीएम मशीन अद्ययावत बोटीचा मोठी मदत होणार असून महाबळेश्वर ट्रेकर्स टीमचे दहा सदस्य यासाठी सेवा देणार आहेत.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin