Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर तालुका वारकरी आषाढी वारीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान; १७ वर्षांची परंपरा कायम

 महाबळेश्वर तालुका वारकरी आषाढी वारीचे भक्तीमय वातावरणात प्रस्थान; १७ वर्षांची परंपरा कायम.....



महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर(प्रतिनिधी)


प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही महाबळेश्वर तालुका वारकरी आषाढी वारीचे पंढरपूरकडे अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात प्रस्थान झाले. महाबळेश्वर तालुक्याची ही १७ वर्षांची प्रदीर्घ परंपरा असून, विठू नामाच्या गजराने आणि टाळ-मृदंगाच्या आवाजाने संपूर्ण महाबळेश्वर नगरी दुमदुमून गेली होती. महाबळेश्वर येथील श्रीराम मंदिर येथे वारीच्या प्रस्थान सोहळ्याला तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला आणि दर्शन घेतले.


​या सोहळ्याप्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व युवा नेते  राजेंद्रशेठ राजपुरे, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष  सुनील शिंदे, नगरसेवक संतोष आबा शिंदे, रवींद्र कुंभारदरे, रोहित ढेबे आणि माजी सभापती  विजय भिलारे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शिवसेना शहर प्रमुख  विजय नायडू, जावळी बाजार समितीचे माजी अध्यक्ष  राजेंद्र आबा भिलारे आणि  राम बाजार समितीचे अध्यक्ष  किसनसेठ भिलारे यांनी उपस्थित राहून वारकऱ्यांचे स्वागत व कौतुक केले.

विविध संस्था व बँक पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा

​यावेळी माजी नगराध्यक्ष  प्रभाकर देवकर, अर्बन बँकेचे माजी चेअरमन  सचिन धोत्रे, सुरेश शिंदे, नाना वाडेकर संचालिका  उषाताई ओंबळे यांनी वारीला शुभेच्छा दिल्या. श्री राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष  तोषनिवाल,  दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय जाधव यांच्यासह महेश कोमटी आणि दिलीपसेठ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

​वारीच्या यशस्वी आयोजनात महाबळेश्वर व्यापारी मंडळ आणि टॅक्सी संघटनेने मोठे योगदान दिले. व्यापारी मंडळाचे पदाधिकारी संजोग तोषणीवाल, योगेश बावळेकर, आनंद पल्लोड, मंगेश शेटे, नितीन परदेशी, अमित कोमटी व श्रीकांत जाधव यांनी वारकऱ्यांची सेवा केली. तसेच टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष दादा मानकर आणि सचिव इरफान कुरेशी यांच्यासह युसूफ मुजावर, अनिल पारठे, चंद्रकांत जाधव व बबन ढेबे, लक्ष्मण बावळेकर, नारायण शिंदे, दत्तात्रय बावळेकर आणि लक्ष्मण शिंदे यांनीही या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला.

वारकऱ्यांचा अभूतपूर्व उत्साह

​ 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल'च्या जयघोषात आणि भगव्या पताका हाती घेऊन निघालेल्या या दिंडीने महाबळेश्वरकरांचे लक्ष वेधून घेतले. १७ वर्षांची ही अखंड परंपरा यापुढेही अशीच दिमाखात चालू राहील, असा विश्वास याप्रसंगी आयोजक व मान्यवरांनी व्यक्त केला.

                 बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                      संपादक :- राहुल शेलार 

                         📱 9765576377

             कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

                         📱 9403546 485