Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरमध्ये भर पावसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवला ताफा; शिवसैनिकांशी साधला आपुलकीचा संवाद

 महाबळेश्वरमध्ये भर पावसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थांबवला ताफा; शिवसैनिकांशी साधला आपुलकीचा संवाद.....



महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर (प्रतिनिधी)

 महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे गेल्या दोन दिवसांपासून आपल्या 'दरे' या मूळ गावी मुक्कामी होते. आज महाबळेश्वर मार्गे मुंबईकडे परतत असताना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे मुसळधार पावसात वाट पाहणाऱ्या शिवसैनिकांना पाहून त्यांनी तातडीने आपला ताफा थांबवला आणि कार्यकर्त्यांची आपुलकीने विचारपूस केली.

गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिंदे महाबळेश्वर मार्गे मुंबईकडे रवाना होत असल्याची माहिती मिळताच शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक एकत्र जमले. यामध्ये महिला शिवसैनिकांची उपस्थिती लक्षणीय होती.

धुवाधार पाऊस असतानाही राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात ताटकळत उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांना पाहून श्री. शिंदे यांनी ताफा थांबवून सर्वांशी संवाद साधला. या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू यांनी त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान, स्थानिक मेहंदी आर्टिस्ट आकांक्षा अनिल पारठे यांनी मेहंदीच्या माध्यमातून रेखाटलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आकर्षक पोर्ट्रेट मेघा चोरगे यांनी श्री. शिंदे यांना दाखवले. हे अप्रतिम पोर्ट्रेट पाहून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कलाकार आकांक्षा पारठे यांच्या कलेचे विशेष कौतुक केले.

या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू, गोविंद कदम, मेघा चोरगे, पूजा उतेकर, सोनाली बांदल, सुनिता फळणे, शितल वाईकर, प्रभा नायडू, अपूर्वा डोईफोडे, मंगल फळणे, किरण मोरे, सुभाष फळणे, सचिन ओतारी, मंगेश चोरगे, राहुल साळुंखे यांच्यासह पक्षांचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

               संपादक :- राहुल शेलार 

                  📱 9765576377

        कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                  📱 9403546 485