महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर मोहरी खचली; नगरपरिषदेची तत्परता, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू
दोन ते तीन तासांत लहान गाड्यासाठी वाहतूक सुरू करण्यात आली
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावरील एमपीजी नजीक असलेली मोहरी खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक अत्यंत धोक्याची बनली होती. काल सायंकाळच्या सुमारास या रस्त्याला भेग पडली होती, तर आज पहाटेच्या सुमारास रस्ता अधिक खचल्याने लहान व मोठ्या वाहनांची जाण्या-येण्याची वाट पूर्णपणे बंद झाली होती.
ही गंभीर बाब महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेशजी पाटील यांच्या महाबळेश्वर शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडु यांनी निदर्शनास आणून दिले.
मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे मुख्य लिपिक बबन जाधव यांना रस्त्याचा खचलेला भाग काढून तेथे खडी व मुरूम भरून रस्ता पूर्ववत करण्याचे आदेश दिले.
आदेश मिळताच मुख्य लिपिक बबन जाधव यांनी बांधकाम विभागाचे सुनील केळगणे व पवार यांच्यामार्फत कामगारांची तुकडी लावून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू केले. घटनास्थळी जेसीबी, मुरूम आणि रोलर फिरवून रस्ता भक्कम करण्याचे काम वेगाने सुरू आहे. येत्या दोन ते तीन तासांत महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावरील वाहतूक लहान गाडयासाठी पूर्णपणे सुरळीत करण्यात आली , अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या संपूर्ण कामगारांच्या तत्पर कारवाईदरम्यान शिवसेना शहरप्रमुख विजय भाऊ नायडू व पत्रकार राहुल शेलार हे प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते. नगरपरिषदेने दाखवलेल्या या जलद कार्यतत्परतेमुळे तापोळा मार्गावरील प्रवासी व स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485



Social Plugin