महाबळेश्वर पोलिसांची धडक कारवाई:
३ लाख २२ हजारांचे १४ हरवलेले मोबाईल अन् ऑनलाईन फ्रॉडमधील २ लाख २५ हजार रुपये तक्रारदारांना परत
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
पर्यटनाची राजधानी असलेल्या महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत महाबळेश्वर पोलिसांनी अत्यंत चिकाटीने शोध घेत 3 लाख ,२२ हजार रुपये किमतीचे १४ हरवलेले मोबाईल हस्तगत केले आहेत. तसेच ऑनलाईन सायबर फसवणुकीतील लाख २५ हजार रुपये तक्रारदारांना परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. अशा प्रकारे एकूण ५ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक (सातारा) श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक (सातारा) श्रीमती वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (वाई विभाग) श्री. सुनील साळुंखे यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हर्षद गालिंदे यांना गहाळ मोबाईलचा शोध घेण्याबाबत विशेष सूचना व मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर केला. महाराष्ट्र व इतर राज्यातील मोबाईल मिळालेल्या लोकांशी सातत्याने संपर्क साधून चिकाटीने पाठपुरावा केला आणि १४ मोबाईल हस्तगत केले.
केवळ मोबाईलच नाही, तर ऑनलाईन सायबर फसवणुकीबाबत आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेत पोलिसांनी ५ तक्रारदारांचे अडकलेले २ लाख २५ हजार रुपये यशस्वीरीत्या रिकव्हर करून त्यांना परत मिळवून दिले.
नागरिकांचे हरवलेले मोबाईल आणि ऑनलाईन सायबर गुन्ह्यांतील रक्कम परत मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यापुढेही अशीच सातत्याने राबवली जाईल महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी सांगितले
ही धडक कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पोलीस निरीक्षक श्री. हर्षद गालिंदे, सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, रुपाली काळे, वैभव भिलारे, शंकर गलांडे व बाळू भागरे या पथकाने केली आहे
महाबळेश्वर पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे नागरिक व पर्यटकांकडून पोलीस प्रशासनाचे विशेष आभार व कौतुक केले जात आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin