Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

नवनियुक्त पोलीस निरीक्षक हर्षद गलींदे यांचा शिवसेना वतीने सत्कार

 नवनियुक्त पोलीस निरीक्षक हर्षद गलींदे यांचा शिवसेना वतीने सत्कार




महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 

महाबळेश्वर पोलीस ठाण्याचा पदभार नुकताच नवनियुक्त पोलीस निरीक्षक हर्षद गलींदे यांनी स्वीकारला आहे. यानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाबळेश्वर शहर शाखेच्या वतीने पोलीस निरीक्षक गलींदे साहेबांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

महाबळेश्वर पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ शिवसैनिक रमेश शिंदे आणि आप्पा साळुंखे यांच्या शुभहस्ते नवनियुक्त पोलीस निरीक्षकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राजेश कुंभारदरे (माजी जिल्हाप्रमुख, सातारा जिल्हा) राजाभाऊ गुजर (शिवसेना शहरप्रमुख)राजेश साळवी (उपशहरप्रमुख)शिल्पा ठक्कर (महिला संघटिका) वसुधा बगाडे (उपशहर संघटिका)प्रविण शिंदे (माजी नगरसेवक) किसन खामकर (नाट्य शिव प्रतिष्ठान) संजय कदम (ज्येष्ठ शिवसैनिक) आकाश साळुंखे (युवासेना शहरप्रमुख) शंकर ढेबे (विभाग प्रमुख) अमोल साळुंखे (आरोग्य सेना) शाहनवाज खारखंडे (शाखाप्रमुख) यांच्यासह अरुण बावळेकर, सुशांत पारठे, उस्मानभाई खरखंडे, आल्लीभाई वारुणकर, समीर भाई तांबोळी, दिपक ताथवडेकर, अतुल पारवे, निलेश केळगणे, नाना साळुंखे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.


नवनियुक्त पोलीस निरीक्षक हर्षद गलींदे यांनी या सत्कार बद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. तसेच महाबळेश्वर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन नेहमीच तत्पर राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


       बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

              संपादक :- राहुल शेलार 

                   📱 9765576377

       कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                  📱 9403546 485