महाबळेश्वरच्या इनर व्हील क्लबला जिल्हास्तरीय सन्मान
इनर व्हील डिस्ट्रिक ३१३ या व्यासपीठावर डिस्ट्रिक चेअरमन डॉ आशा देशपांडे यांच्याकडून गौरव
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
सेवा कार्यात अग्रेसर असलेल्या इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरने २०२५-२६ या वर्षात केल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल इनर व्हील डिस्ट्रिक्ट ३१३ ने घेतली डिस्ट्रिक चेअरमन डॉ आशा देशपांडे यांच्या हस्ते सदस्यांना सन्मानित करण्यात आले गेल्या वर्षभरामध्ये केल्या सामाजिक कार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्हास्तरावर विविध प्रतिष्ठित पुरस्कार पटकावले आहेत यामध्ये प्रामुख्याने प्रमुख पुरस्कार हा अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे व सचिव सपना राजीव अरोरा यांना ‘OUR PRESTIGIOUS AWARDS’ अंतर्गत ‘स्टार गोल्डन बेस्ट प्रेसिडेंट–सेक्रेटरी पेअर अवॉर्ड – जोडी क्रमांक १’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाबळेश्वर स्टार प्रेसिडेंट – इनक्रेडिबल वर्क अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला सदस्य अदिती भांगडिया यांना ‘स्टार ट्रेझरर अवॉर्ड’ मध्ये पाचवा क्रमांक प्राप्त झाला तर इनर व्हील क्लबऑफ महाबळेश्वरला इतर सन्मान देखील मिळाले असून बालहक्क, महिलांचा दर्जा, ज्येष्ठ नागरिक, युवा विकास, पर्यावरण संरक्षण, कुटुंब कल्याण आणि इनर व्हील ब्रँडिंग या क्षेत्रांतील कामगिरीबद्दल क्लबला तीन ‘सर्टिफिकेट्स ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आली. ‘हॅपी स्कूल’ प्रकल्पांतील कार्यासाठी क्लबचा तीन सुवर्णपदकांनी गौरव करण्यात आला.
कार्याचा आढावा--
महाबळेश्वर इनर व्हील क्लब ने अध्यक्षा वर्ष पार्टे यांच्या अध्यक्षपदात सन २०२५–२६ या कार्यकाळात क्लबने ८५ हून अधिक समाजोपयोगी प्रकल्प राबवले होते या यशामागे इनर व्हील क्लब सदस्यांचे माथे योगदान लाभल्याचे सांगून त्यांचे समर्पण, एकजूट आणि सातत्यपूर्ण परिश्रमामुळेच आम्हाला इनर व्हील डिस्ट्रीत ३१३ मध्ये सन्मानित करण्यात आल्याचे अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी सांगितले.तसेच “एकत्रितपणे सेवा केली, एकत्रितपणे यश मिळवले आणि एकkत्रितपणे इतिहास घडवला,” असे क्लबने म्हटले.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin