Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरमध्ये विनापरवाना बेकायदेशीर झाडे तोडल्याप्रकरणी हडपसरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

 महाबळेश्वरमध्ये विनापरवाना बेकायदेशीर झाडे तोडल्याप्रकरणी हडपसरच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल 

महाबळेश्वर टाईम्स 

​महाबळेश्वर : प्रतिनिधी 

महाबळेश्वर येथील डचेस रोडवर हॉटेल गौरीशशेजारी विनापरवाना आणि बेकायदेशीरपणे वृक्षतोड केल्याप्रकरणी पुणे येथील एका जमीन मालकावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र झाडे तोडण्याबाबत (नियमन) अधिनियम १९६४ चे कलम ३(१) आणि ४ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

​याप्रकरणी महसूल विभागाचे ग्राम महसूल अधिकारी (सजा मेटगुताड) सागर दिलीप शिंदे (वय ३५, रा. सोनगीरवाडी, ता. वाई, जि. सातारा) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ​हडपसर मधील संशयित   राहुल उत्तम बालवडकर (वय ५६, रा. हडपसर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी राहुल बालवडकर यांनी आपल्या मालकीच्या जागेतील झाडे कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय तोडली. हा प्रकार समोर आल्यानंतर शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी महसूल अधिकारी सागर शिंदे यांनी गुरुवारी पोलीस ठाण्यात येऊन सरकारतर्फे अधिकृत फिर्याद दिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांनी पोलीस ठाण्यापासून उत्तरेस ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

​  महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मढेंकर (बक्कल नं. ६३१) या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. महाबळेश्वरसारख्या संवेदनशील पर्यावरण क्षेत्रात  विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांवर प्रशासनाने कडक पावले उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


             बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                 संपादक :- राहुल शेलार 

                    📱 9765576377

           कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                    📱 9403546 485