सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यतत्पर मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे राज्यस्तरीय कौतुक
महाबळेश्वर टाइम्स
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री. शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांच्याकडून विशेष अभिनंदन
महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्क, आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य देत केलेल्या उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री. शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी महाबळेश्वर नगरपरिषदेच्या कामकाजाचा आढावा घेताना श्री. योगेश पाटील यांच्या कर्मचारीहिताच्या कार्याचे विशेष कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
कौतुकास्पद कार्य
सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी मेडिक्लेम योजना
सफाई कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली मेडिक्लेम योजना सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी तत्परतेने लागू करण्यात आली.
नियुक्ती प्रक्रियेला वेग
सफाई कर्मचाऱ्यांना विविध पदांवर व सेवांमध्ये वेळेत नियुक्ती मिळावी यासाठी प्रशासकीय प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण करण्यात आली.
कामगार कल्याणाला प्राधान्य
कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण, त्यांच्या हिताचे निर्णय आणि कल्याणकारी उपाययोजनांना प्रशासनाच्या माध्यमातून विशेष प्राधान्य देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री. शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की«“सफाई कर्मचारी हे शहराच्या आरोग्याचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या आरोग्याची, सुरक्षेची आणि हक्कांची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्याचा गौरव होणे ही संपूर्ण महाबळेश्वर शहरासाठी आणि प्रशासनासाठी अभिमानाची बाब आहे.”»
आपल्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर नगरपरिषदेच्या माध्यमातून कर्मचारीहित, लोककल्याण आणि शहराच्या विकासासाठी अशीच उल्लेखनीय कामगिरी सातत्याने घडत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा दिल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तसेच संजय जेधे( आखिल भारतीय सफाई मजदूर युनियन ,राष्ट्रीय उपाध्यक्ष)
अशोक मारुडा(महाराष्ट्र उपाध्यक्ष) व इतर मान्यवर उपस्थित होते


Social Plugin