महाबळेश्वर येथे ८० वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा
महाबळेश्वर टाईम्स
तहसिलदार कार्यालय येथे सचिन म्हसके, दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे न्यायाधीश यु एस इवरे यांच्या हस्ते ,पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक हर्षद गालिंदे ,नगरपरिषद प्रांगणात नगराध्यक्ष । सुनील शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण सुभाष चंद्र बोस चौकात उपनगराध्यक्ष नासिर भाई मुलाणी, पंचायत समिती येथे सभापती शकुंतला चोरमले यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ सोहळा अत्यंत दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्य ध्वजारोहण सोहळा शनिवारी सकाळी १०.०५ वाजता महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणामध्ये नगराध्यक्ष सुनील लक्ष्मण शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडला. तसेच शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे उपनगराध्यक्ष नासिर युनूस मुलाणी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम, नियोजन व विकास समिती सभापती ॲड. संजय बाळकृष्ण जंगम, स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती अफजल मुबारक सुतार, महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता दत्तात्रय वाडकर, तसेच शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती रोहित बबनराव देवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच या कार्यक्रमास नगरसेवक संतोष बबन शिंदे, राहुल प्रकाश पिसाळ, रविंद्र मधुकर कुंभारदरे, कुमार गोरखनाथ शिंदे, मिलिंद मारुती ढेबे, राजू ईस्माईल नालबंद आणि नगरसेविका विद्या शरद बावळेकर, रेश्मा किरण ढेबे, शबाना अल्ताफ मानकर, विमल पांडुरंग पार्टे, स्मिता सुनील पाटील यांच्यासह शहरातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मुख्याधिकारी योगेश सुमन बाळकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंदाने यांनी केले.स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वर तहसील कार्यालयात सचिन मस्के यांनी केले ध्वजारोहण
महाबळेश्वर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आज सकाळी ९.०५ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
तहसीलदार सचिन मस्के यांच्या यांनी ध्वजारोहण केले. या राष्ट्रोत्सवाच्या प्रसंगी तालुक्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन निवासी तहसीलदार दीपक सोनावले, महसूल नायब तहसीलदार विनोद सावंत, निवडणूक नायब तहसीलदार जहीदा एस. शेख, पुरवठा निरीक्षण अधिकारी अनिल गवळी आणि तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद यांनी केले.स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वर पोलीस कार्यालयात हर्षद गालिदे यांनी केले ध्वजारोहण
भारतीय स्वातंत्र्य दिन दिन समारंभ महाबळेश्वर येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त महाबळेश्वर पोलीस कार्यालयाच्या प्रांगणात आज सकाळी मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांनी ध्वजारोहण केले. या राष्ट्रोत्सवाच्या प्रसंगी साय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजने नागरिक आणि विद्यार्थ्यांनी, पोलीस कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंदमोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहण महाबळेश्वर दिवाणी व फौजदारी न्यायालय येथे न्यायाधीश यु एस इवरे यांच्या हस्ते झाले सकाळी 7:50 वाजता त्यावेळी हजर सर्व कोर्ट स्टाफ .सहाय्यक अधीक्षक संतोष जगताप, पब्लिक प्रॉसिक्युटर ऍडव्होकेट दिलावर मलिक शेख , महाबळेश्वर तालुका वकील संघाचे एडवोकेट. रेणुका ओंबळे, ऍड. राजेश जगन्नाथ शिंदे ऍड .पी आर हिरवे ऍड लता मांजलकर ऍड. अमन बागवान, ऍड. नगरसेवक. संजय जंगम ऍड आरती जगताप व इतर हजर होते...
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485





Social Plugin