Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

अल्ताफ शारवान यांचे अपघाती निधन

 अल्ताफ शारवान यांचे अपघाती निधन


महाबळेश्वर टाईम्स

महाबळेश्वर  : प्रतिनिधी                                          

महारोळे, ता. महाबळेश्वर येथील अल्ताफ हाशम शारवान यांचा दुर्दैवी अपघातानंतर उपचारादरम्यान  आज मंगळवार दि ८/९/२०२६मृत्यू झाला. सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास पाऊस व धुक्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने मांघर स्टॉपजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.


या अपघातात अल्ताफ शारवान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी व चार मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने महारोळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.