महाबळेश्वरचा वीजप्रश्न कायमस्वरूपी सुटणार; पाचगणी-महाबळेश्वर भूमिगत केबलसाठी शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर महावितरणचे महत्त्वाचे पाऊल
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर प्रतिनिधी:
पावसाळ्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे निसर्गरम्य महाबळेश्वर अंधारात बुडण्याचे दिवस आता लवकरच संपणार आहेत. महाबळेश्वर आणि पाचगणी दरम्यान भूमिगत (अंडरग्राउंड) वीज केबल टाकण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला असून, महावितरणने हे काम आगामी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच येत्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
या वेळी महाबळेश्वर शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, सातारा शहरप्रमुख प्रणव सावंत, निमिष शहा, उपशहरप्रमुख राजेश साळवी, शहानवाज खरखंडे, अमोल साळुंखे, अलीभाई वारुणकर, जितेश कुंभारदरे आणि निलेश केळघणे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
दरवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत पडणाऱ्या धुवाधार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यांमुळे महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. याचा मोठा फटका स्थानिक रहिवासी, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक तसेच देश-विदेशातून येणाऱ्या लाखो पर्यटकांना बसतो. या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना करावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने १६ ऑक्टोबर रोजी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आक्रमक भूमिका घेण्यात आली. महाबळेश्वर ते पाचगणी दरम्यान भूमिगत केबल टाकल्यास प्रतिकूल हवामानातही वीजपुरवठा सुरळीत राहील, असा मुद्दा निवेदनात मांडण्यात आला. तसेच पाचगणी सबडिव्हिजनअंतर्गत येणाऱ्या विजेच्या समस्या तातडीने सोडवण्याची मागणीही करण्यात आली.
शिवसेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महावितरण प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलत हे काम जूनपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin