Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर : येथे काकडा आरती उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात

महाबळेश्वर : येथे काकडा आरती उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात                             

                         महाबळेश्वर : येथे काकडा आरती उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात झाली. दरवर्षीप्रमाणे येथील श्रीराम विठ्ठल मंदिरात श्रीराम विठ्ठल मंदीर ट्रस्ट,माऊली भजनी मंडळ व काकडा आरती महिला ग्रुपच्या वतीने कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत एक महिनाभर काकडा आरती उत्सव पार पडतो. येथे १९५८ पासून काकडा उत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. या कालावधीत पहाटे चार वाजल्यापासून पंचपदी, अभंग, भूपाळीचे अभंग, गवळण, याशिवाय  विठ्ठलाची आरती नित्यनियमाने होत असते. त्यानंतर रोज अभिषेक कर्त्या कडून मंदीरात प्रसादाचे वाटप केले जाते. काकडा आरती सांगता सोहळा त्रिपुरारी पौर्णिमेला माऊली भजनी मंडळाच्या सुस्वर भजनाने व अन्न कोटाच्या प्रसादाने महिनाभर रोज पहाटे भक्ती भावाने उपस्थित राहणा-या ५० ते ६० महिला व पुरुष भाविकांच्या उपस्थितीत जड अंतःकरणाने पार पडतो.
संपूर्ण महिनाभर सुरू असलेला काकड आरती सोहळ्यासाठी श्रीराम विठ्ठल मंदीर ट्रस्टचे दिलिप शिपटे,रतिकांत तोषणीवाल सचिन धोत्रे, नितीन परदेशी, अशोक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभते तर पहाटेच्या भजना साठी प्रभाकर देवकर,बाबा आखाडे,किसन खामकर, शिरिष गांधी,
दत्तात्रय सुतार,सुरेश सपकाळ, श्रीकांत जाधव,अजय आखाडे,मनोहर धोत्रे,शाम जेधे,बुधाजी सुतार, अशोक सावंत, काशिनाथ केंडे, राजाराम माने, लक्ष्मण कदम,सुरेश उगले तर महिलांमध्ये वनिता भोसले, मंगल शिंत्रे, माधुरी धोत्रे,निलम धोत्रे, विमलताई पार्टे,लिलाताई शिंदे,उषाताई ओंबळे, मंगल पाटील,स्वाती शिपटे ई.परिश्रम घेतात.