महाबळेश्वरमध्ये नाट्य शिवप्रतिष्ठानच्या वतीने रंगभूमी दिन उत्साहात साजरा .....
संदिप देवकुळे महाबळेश्वर
महाबळेश्वर:- प्रसिद्ध पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये गेली ५० वर्षे सांस्कृतिक ,कला व नाट्य क्षेत्रात कार्यरत असलेली तालुक्यातील एकमेव नोंदणीकृत संस्था नाट्य शिवप्रतिष्ठान या संस्थेने जागतिक रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच हौशी कलाकारांसाठी अभिनय, चर्चासत्र आणि अभिनय कार्यशाळेचे भव्य आयोजन केले होते. या उत्सवात प्रसिद्ध मराठी मालिका कलाकार, माधुरी सोमण, सहायक दिग्दर्शक ऋग्वेद सोमण व कथ्थक नृत्यांगना अन्विता वैद्य यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व नटराजाच्या पुजनाने झाली.
यावेळी अ.भा.नाट्य परिषद महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर, नाट्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किसनराव खामकर, माजी नगराध्यक्ष, प्रभाकर देवकर, रविंद्र कुंभारदरे,ज्येष्ठ पत्रकार, संजय दस्तुरे, विलास काळे तसेच रतिकांत तोषणीवाल, दिलिप शिपटे, शिरिष गांधी,वृषाली डोईफोडे, रोहिणी वैद्य,लिलाताई शिंदे, राणी शिंगरे, प्रतिष्ठानचे नितीन चौरसिया,श्रीकांत जाधव,रणजित तांबे,संतोष पवार, अरुण शिंगरे,रवि संकपाळ, दिपक बावळेकर,अजय आखाडे, दिनेश भिसे,शाम जेधे व इतर मान्यवर उपस्थित होते.
आयोजनाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक होते प्रसिद्ध मालिका कलाकारांनी पात्रे चांगली निवडताना, पात्रास जीव देण्याची कला, दृश्य सादरीकरण, तसेच अभिनयातील विशिष्ट हावभाव या बाबतीत महत्वाचे आणि प्रत्यक्ष कृतितून नवोदित कलाकारांना मार्गदर्शन दिले. त्यांच्या अनुभववर्धक संवादातून उपस्थितांना
नाटकाच्या मागील मजकुराची, संवादांच्या जीवंतपणामागील लागलेली मेहनत आणि भाव-संकल्पांचा अर्थ समजला. त्यांच्या प्रेरणादायी सत्रातून नवीन पिढीच्या पात्रांना आत्मविश्वास देण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन झाले.
या अभिनय कार्यशाळेतून यशमंत्र म्हणजे सर्वांनी मिळून मराठी रंगभूमीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रम सकाळ पासून दुपार पर्यंत चालला,
जागतिक रंगभूमी दिनाचे महत्त्व सांगताना संस्थेचे कार्याध्यक्ष तथा अ.भा.नाटय परिषद नियामक मंडळाचे सदस्य राजेश कुंभारदरे म्हणाले, “रंगभूमी म्हणजे केवळ तालिम नाही, तर समाजाला सजग करणारी कला आहे. नाट्य शिवप्रतिष्ठान सारख्या संस्थेच्या माध्यमातून नविन पिढीने आपल्यातील कलेला वाव देऊन समृद्ध करावे व स्वतः बरोबरच आपले व महाबळेश्वरचे नाव देखील मोठे करावे.
महाबळेश्वरमधील रंगभूमी दिनाचा हा उत्सव हा केवळ सादरीकरणाचा भाग नव्हता तर प्रसिद्ध कलाकारांनी दिलेल्या मार्गदर्शनाने नवविद्यार्थ्यांना सतत नवीन प्रेरणा मिळेल आहे अशी अपेक्षा सर्व कलाकार, प्रेक्षक, व आयोजकांनी व्यक्त केली.


Social Plugin