- महाबळेश्वर टाईम्स ✍️ कसबे बामणोलीच्या श्री.भैरवनाथाची यात्रा गुरूवार दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होणार.
संपादक राहुल शेलार कार्यकारी संपादक रियाज मुजावर
-जावळी तालूक्यातील कसबे बामणोली येथील ग्रामदैवत श्री.भैरवनाथ देवाची यात्रा दत्त जयंती मुहूर्तावर दिनांक ४ व ५ डिसेंबर २०२५ रोजी संपन्न होणार आहे.यात्रेनिमीत्त विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत सर्व ग्रामस्थांच्या व भाविकांच्या उपस्थितीत श्री.भैरवनाथाचा अभिषेक पार पडणार आहे .त्यानंतर सकाळी मुंबई मंडळाच्या वतीने विवीध शासकीय योजनांची माहिती व त्याचे फायदे याचे सादरीकरण करण्यात येणार आहे तसेच सकापळी ११ ते दुपारी ४ या वेळेत मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळाच्या वतीने मंडळाचे कार्यकर्ते कै.कमलाकर श्रीरंग शिंदकर यांच्या स्मरणार्थ सातार्यातील नामांकित सरवटे आय क्लिनीक व लेझर सेंटर हाॅस्पिटल सातारा यांचे मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन आले आहे.त्यानंतर मान्यवर मंडळीच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.रात्री येणार्या भाविकांसाठी गोरे बंधूच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच रात्री ८ ते १० वेळेत मान्यवर मंडळी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.त्यानंतर यात्रेकरूच्या मनोरंजनासाठी कार्यक्रमाचे राञी १० ते १ या वेळेत होणार आहे व त्यानंतर रात्री देवाचा छबिणा निघणार आहे.शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर,२०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वेळेत याञेसाठी आलेले भावीक-भक्तगण आसपासच्या गावावरून आलेल्या देवाच्या पालख्यांचे दर्शन घेणार आहेत.यात्रेसाठी आलेल्या मंडळीना मनोरंजनासाठी प्रसिद्ध लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी ३ ते सायंकाळी ५ यावेळेत पैलवानांचा कुस्तिचा जंगी फड होईल.सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत तळेभरणीचा कार्यक्रम होईल व त्यानंतर आसपासच्या गावावरून आलेल्या पालख्या परत आपल्या गावी रवाना होतील व त्यानंतर यात्रेची सांगता होईल.


Social Plugin