महाबळेश्वर टाईम्स
✍️ इनर व्हील कल्ब ऑफ महाबळेश्वरच्यावतीने आर्थिक मदत.... 📰संपादक राहुल शेलार
📰 कार्यकारी संपादक रियाज मुजावर
महाबळेश्वर टाईम्स : प्रतिनिधी
महाबळेश्वर दि ०४-१२ महाबळेश्वर पर्यटनस्थळी टॅक्सी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे हरिदास दळवी यांची काही महिन्यांपूर्वी ओपन-हार्ट सर्जरी झाली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे रुग्णालयाचा खर्च पेलवणे कठीण होते त्यांच्या पत्नी सुशिला हरिदास दळवी या देखील घरकाम करून कुटुंबास हातभार लावत होत्या कुटुंबातील तीन मुलींचा शैक्षणिक व इतर खर्च भागवणे कठीण झाले होते त्यांची ही परिस्थिती लक्षात घेऊन इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्यावतीने चाळीस हजार रुपयांची (४०,०००/-) ची आर्थिक मदत त्यांना करण्यात आली यावेळी इनर व्हील क्लब अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे,,जेष्ठ सदस्य पीडीसी रोहिणी वैद्य,स्वाती बिरामणे,अदिती भांगडिया,मनीषा कोमटी दीपा मार्तंड आदी सदस्या यावेळी उपस्थित होत्या ✍️ इनरव्हील क्लब ऑफ म'श्वर च्यावतीने हस्तकला कार्यशाळा आयोजन ✍️
महाबळेश्वर दि ०४-१२ सेवाकार्यात अग्रेसर असलेला महाबळेश्वर इनर व्हील क्लबच्यावतीने उत्तर प्रदेश मधील फारुखाबाद येथील एस एम ज्युनियर हायस्कुल येथील विद्यार्थ्यांसाठी हस्तकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ वस्तू कश्या घडवायच्या याची इत्यंभूत माहिती देण्यात आली शाळेतील तुटलेल्या बेंचची दुरुस्ती ,खराब झालेल्या बेंचच्या जागी नवीन बेंचसाठीची आर्थिक मदत देखील क्लबच्यावतीने करण्यात आली हा उपक्रम इनरव्हील क्लब सचिव सपना अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली इनर व्हील क्लब अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पाडला त्यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला या कार्यशाळेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना बिस्किटे व चिप्स वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला व त्यांच्या दिवसात उत्साहाची भर पडली.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :- राहुल शेलार
मो.नं 9422604420
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
मो.नं : 9403546485



Social Plugin