महाबळेश्वर तालुक्यातील मौजे वेंगळे येथे जननी देवी यात्रा उत्सव.....
महाबळेश्वर तालुक्यातील मौजे वेंगळे गावचे ग्रामदैवत व जागृत देवस्थान श्री जननी सुकाई देवीची यात्रा मार्गशीर्ष कृष्ण ३ या तिथी वर म्हणजे ६ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे.
श्री जननी देवी चे वेंगळे येथे भव्य व आकर्षक मंदिर आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रेदिवशी विभागातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.
यात्रेच्या दिवशी. उतव्याचा उतेश्वर , आहिर चा केदारेश्वर, तापोळ्याची पद्मावती देवी, वानवली आहिरेची काळेश्वरी देवी , सौदरीची गवरजाई देवी, कुरोशीचा भैरवनाथ, गोगव्याचा भैरवनाथ, रामेघरची वाघजाई देवी, व वाकीची नवलाई देवी या देव देवतांच्या सर्वाधिक पालख्या वेंगळे येथे असतात.
आकर्षक मंडप व मंदिर सजावट व विद्युत रोषणाई पहावयास मिळते. लेझीम हे पारंपारिक नृत्य प्रकार येथे पहावयास मिळतो.
यात्रेच्या निमित्ताने
०६/१२/२०२५. शनिवार रोजी सकाळी ९ ते साय ५ गावातून पालखी मिरवणूक, रात्री ८ ते ८.३० देवीची आरती, रात्री ८.३० ते १० नवस व लेझीम, रात्री १० ते १०.३० छबिना रात्री, १०.३० ते ११ गोंधळ, रात्री ११ ते ११.३० स्वागत सत्कार, रात्री ११.३० ते पहाटे करमणुकीचा कार्यक्रम ( तमाशा ) कमलराणी कराडकर.
०७/ १२/२०२५. रविवार रोजी स ११ ते दुपारी ३ करमणुकीचा कार्यक्रम ( तमाशा ),दुपारी ३ ते सायं ५ कुस्त्यांचा जंगी फड.
सायंकाळी ५ वाजता रिंगण तळी भरणे अशी कार्यक्रम रुपरेषा असणार आहे. अशी माहिती माजी सरपंच गोविंद सकपाळ यांनी दिली आहे.
यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात. दर्शनासाठी भाविकांनी यावे असे आवाहन ग्रामस्थ वेंगळे यांनी केले आहे. गावकऱ्यांकडून यात्रेची उत्तम आयोजन व तयारी करण्यात आली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :- राहुल शेलार
मो.नं 9422604420
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
मो.नं : 9403546485


Social Plugin