*महाबळेश्वर येथे ख्रिसमस सन* *उत्साहात साजरा*
*पर्यटकांचे केले स्थानिकांनी स्वागत*
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेतील होली क्रॉस चर्च हे एक सुंदर ब्रिटिश कालीन रोमन कॅथोलिक चर्च आहे. या चर्चमध्ये ख्रिश्चन धर्मियांनी येशू ख्रिस्त यांची सामूहिक प्रार्थना करून क्रिसमस सन उत्साहात साजरा केला. सनानिमित्त महाबळेश्वर येथील सर्व धर्मीयांनी चर्चला भेट दिली. ख्रिश्चन धर्मियांना शुभेच्छा दिल्या.
या सणानिमित्त महाबळेश्वर मध्ये दाखल झालेल्या पर्यटकांचे स्वागत स्थानिकांनी केले. रोमन कॅथोलिक चर्चे जवळपास २०० वर्षांपूर्वीचे आहे. हे चर्च लहान असून खिडक्यांसाठी ओळखले जाते. या चर्चे सौंदर्य टिकवून आहे. त्याचे अलीकडेच नूतनीकरण केलेले आहे. या चर्चमध्ये दर शनिवारी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी सामूहिक प्रार्थना आयोजित केली जाते.
क्रिसमस सणानिमित्त या जुन्या ब्रिटिशकालीन चर्चला विद्युतरोषणाई, फुलांची आकर्षक सजावट केली असून याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत.
*ख्रिसमस सनानिमित्त महाबळेश्वर येथील हॉटेल रेस्टॉरंट सजले*
महाबळेश्वर येथे देशभरातून पर्यटनासाठी पर्यटक महाबळेश्वर येथे दाखल झालेले आहेत. या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाबळेश्वर येथील हॉटेल्स, रेस्टॉरंट मालकांनी विद्युत रोषणाई, नाताळबाबांची प्रतिकृती तसेच ख्रिसमस ट्री अशा विविध आकर्षक प्रतिकृतीतून सजवले आहेत. याकडे देखील पर्यटक आकर्षित होत आहेत. मोठ्या प्रमाणात आलेल्या पर्यटकांमुळे आर्थिक उलाढाल मोठी होणार आहे हे नक्की.
नाताळ सण आणि नववर्षाच्या निमित्ताने पर्यटकांची मिनी काश्मीर महाबळेश्वरला व पांचगणीला गर्दी वाढू लागली आहे
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :- राहुल शेलार
मो.नं 9422604420
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
मो.नं : 9403546485




Social Plugin