महाबळेश्वर टाईम्स : प्रतिनिधी
महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या निवडणुकीच् या सुधारीत कार्यक्रमानुसार आज १० डिसेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत अर्ज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली होती. तथापी निवडणूक लढविणाऱ्या कोणत्याच उमेदवाराने निर्देशनपत्र मागे घेतले नाही. उद्या दिनांक ११ डिसेंबर रोजी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेश सुधारीत करण्यात आला आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :- राहुल शेलार
मो.नं 9422604420
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
मो.नं : 9403546485


Social Plugin