पाचगणीत बिबट्याची दहशत...!
फार्म हाऊसवरील कुत्र्याला केली शिकार वनविभागाकडे कारवाईची मागणी.....
महाबळेश्वर टाईम्स : पांचगणी प्रतिनिधी
पांचगणीतील खिंगर रोड परिसरात बिबट्याने हल्ला करून एका पाळीव कुत्र्याला ठार केल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खिंगर रोडवरील शारदा आरोग्य धामजवळ ही घटना घडली असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणीला जोर धरू लागला आहे.
पाचगणी - खिंगर रोडवर शारदा आरोग्य धाम आहे, त्याच्या अगदी जवळच असणाऱ्या पवार निवास शेजारील विहिरीजवळ मन्सूर काझी यांचे फार्म हाऊस आहे. काझी यांच्या फार्म हाऊसवर घराबाहेर नेहमी एक कुत्रे असायचे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास याच कुत्र्यावर बिबट्याने हल्ला चढवला. बिबट्याने कुत्र्याला जागीच ठार करून ते फस्त केले.
रात्री ३ वाजता हल्ला
मन्सूर काझी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री सुमारे ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. घराच्या दरवाजासमोरच असलेले त्यांचे पाळीव कुत्रे बिबट्याने खाल्ले. रात्रीच्या वेळी हा प्रकार घडल्याने कुटुंबीयांना याबाबत अधिक माहिती देता आली नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात बिबट्याच्या अस्तित्वाची आणि संभाव्य धोक्याची जाणीव झाली आहे.
बिबट्याने फार्म हाऊसच्या अगदी जवळ येऊन पाळीव प्राण्यावर हल्ला केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर बिबट्या मानवी वस्तीकडे येत असल्याची भीती व्यक्त होत आहे. कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने या बिबट्याचा त्वरित शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी मन्सूर काझी आणि परिसरातील रहिवाशांकडून केली जात आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक :- राहुल शेलार
मो.नं 9422604420
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
मो.नं : 9403546485


Social Plugin