3 दिवसांपासून पाचगणी ‘डिस्कनेक्ट’ : मोबाईल नेटवर्क कोसळले, पर्यटक-नागरिक वैतागले
पाचगणी | प्रतिनिधी : नौशाद सय्यद
तंत्रज्ञानावर अवलंबून असलेल्या आजच्या युगात मोबाईल व इंटरनेट सेवा ही जीवनाची मूलभूत गरज बनली आहे. मात्र पर्यटन नगरी पाचगणी व परिसरात मागील २ दिवसांपासून मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिक, पर्यटक आणि व्यापारी वर्ग प्रचंड अडचणीत सापडला आहे.
जीओ, वोडाफोन-आयडिया यांसारख्या मोबाईल कंपन्यांचे सिग्नल अचानक गायब झाल्यामुळे कॉल लागत नाहीत, इंटरनेट सेवा बंद आहे, तर बहुतांश मोबाईल ‘नॉट रिचेबल’ दाखवत आहेत. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणेही कठीण बनले आहे.
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण ठप्प झाले असून, व्यावसायिकांचे व्यवहार खोळंबले आहेत. पर्यटनावर आधारित व्यवसायांना याचा मोठा फटका बसत असून ऑनलाईन बुकिंग, डिजिटल पेमेंट, ग्राहकांशी संपर्क या सर्व गोष्टी अडचणीत आल्या आहेत.
पाचगणीसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी सलग दोन दिवस मोबाईल नेटवर्क न मिळणे ही गंभीर बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. मोठ्या जाहिरातींमधून “भक्कम नेटवर्क” व “5G मध्ये आघाडी”चे दावे करणाऱ्या कंपन्यांची प्रत्यक्षातील सेवा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
*नागिरिका मध्ये चर्चा जोरावर*
संबंधित मोबाईल सेवा पुरवठादारांनी तात्काळ दखल घेऊन नेटवर्क सेवा पूर्ववत करावी, अन्यथा ग्राहकांकडून सिमकार्ड बदल व बंद करण्याचा निर्णय नागरिकांना
चर्चा सुरू


Social Plugin