Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

*महाबळेश्वरकडे येणाऱ्या महार्गांच्या कामामुळे पर्यटकांसह स्थानिकांना होतोय मानसिक त्रास.....*

 महाबळेश्वरकडे येणाऱ्या  महार्गांच्या कामामुळे पर्यटकांसह स्थानिकांना होतोय मानसिक त्रास.....

महाबळेश्वर टाईम्स



महाबळेश्वर :  प्रतिनिधी  

मुंबई-पुणे-महाड-सातारा मार्गे महाबळेश्वरला येणाऱ्या प्रमुख तीन मार्गांपैकी म्हणजे मुंबई-गोवा मार्ग ( सध्या पोलादपूर घाट मार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे). मुंबई- बंगलोर ( NH-4 ) वर सुरुर पासून वाई मार्गे महाबळेश्वर मार्ग या रस्त्याचे देखील अत्यंत धीम्यागतीने निकृष्ट दर्जाचे रस्ता रुंदीकरणाचे नियोजन शुन्य काम सुरू आहे. सातार-मेढा-केळघर- महाबळेश्वर रस्त्यावरील केळघरच्या जवळ असलेल्या पुल पाडण्यात आला आहे. या सर्व रस्त्यांच्या कामामुळे व खड्यांमुळे पर्यटकांसह स्थानिकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. यातून महाबहेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी होणार आहे. छोट्या व्यवसायींकावर उपासमारीची वेळे निश्चित येईल.

करोना महामारीतून सावरत असताना नियोजन शुन्य कारभारामुळे आणि अधिकारी वर्गाच्या मनमानी धोरणा मुळे जनतेचे, पर्यटकांचे अतोनात हाल होत आहेत.  वास्तविक पाहता किमान सुरूर - पोलादपूर मार्गाचे संपूर्ण काम पूर्णत्वास आल्या नंतर हे काम सुरू होणे अपेक्षा होती. किमान सार्वजनिक बांधकाम विभाग केळघर जवळील  समजते की या नवीन पूल चा आराखडा आणि आवश्यक परवानग्या अजून प्रलंबित आहेत तर मग इतकी घाई का केली. हे ही न समजण्यासारखे कोड आहे. हा पूल  विक्रमी  ७५ दिवसात पूर्ण होईल का याकडे महाबळेश्वरकरांचे लक्ष लागून राहिले आहे अन्यथा तीनही बाजूने महाबळेश्वर नगरीचे दोर कापले जातील.

सातारा-महाबळेश्वर मार्गावरील केळघरच्या पुढे 2 किमी वर असणारा   पुल पाडुन नवीन पूल करण्यासाठी आता काम सुरू केले आहे. म्हणजे महाबळेश्वर येणाऱ्या तीनही प्रमुख रस्त्यांवर   एकाचवेळी कामे सुरू असल्याने पर्यटक आणि स्थानिक यांना वारंवार वाहतूक कोंडी, खड्डेयुक्त रस्ते वेळेचा अपव्यय आणि नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्यातच आता केवळ ७५ दिवसांनी उन्हाळी पर्यटक हंगाम सुरू होईल आणि त्याचा फटका सर्वांनाच विशेषतः गोर गरीब छोटे मोठे व्यावसायिक यांना बसणार आहे अशी भिती महाबळेश्वर येथील समाजसेवक राजेश कुंभारदरे यांनी व्यक्त केली आहे.



                                 बातम्या व जाहिरातीसाठी 

                                               संपर्क 

                                   संपादक : राहुल शेलार 

                                     मो.नं : 9422604420

                             कार्यकारी संपादक : रियाज मुजावर 

                                 मो.नं :   9403546485