Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर ग्रामदैवत श्री जन्नी मता ( म्हमा देवी) यात्रेस प्रारंभ


 महाबळेश्वरचे ग्रामदैवत श्री जननी माता (म्हमा देवी) यात्रेस प्रारंभ



 .



महाबळेश्वर टाईम्स✍️

ग्रामदैवत श्री जननी माता (म्हमा देवी) ची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही भक्तांच्या उत्साहाने आणि धार्मिक भक्तीमय वातावरणात दि.१९ रोजी साजरी होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित असून देवीभक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे उत्सव समिती कडून कळविण्यात आले आहे.



 दिनांक  १८ जानेवारी रोजी

पहिल्या दिवशी उत्सवाची सुरुवात देवीच्या पालखीची ग्रामप्रदक्षिणेने झाली . ज्या मध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात,  भव्य मिरवणूक निघाली  भाविकांकडून देवीचे दर्शन घेण्यात आले


आज सोमवार दिनांक १९ रोजी  सकाळी साडेपाच वाजता

 श्री जननी आई व भैरवनाथांचा अकरा आवर्तन रुद्राभिषेकाला प्रारंभ झाला असून 

सकाळी सात वाजता पवित्र मंत्रोच्चारात रणचंडिका अग्नीहोम पार पडला . यानंतर साडेअकरा वाजता माहा आरती झाली.


तर दुपारी बारा वाजता सुवासिनींचे हळदीकुंकू व ओटी भरणे हा पारंपरिक कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर दुपारी एक वाजता महाप्रसादाला प्रारंभ झाला व सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले

याच दिवशी स्थानिक पंचक्रोशीतील सांप्रदायिक सुस्वर भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


रात्री ८ ते पहाटे ३ वाजेपर्यंत

 आई जननी व भैरवनाथाचा गोंधळ व जागरणाचा कार्यक्रम होणार असून त्यामध्ये 

देवीच्या गोंधळातील पारंपरिक कला, वासुदेव–पोतराज, गवळण आणि भक्तिगीतांचा समावेश असणार आहे.



मंगळवार दिनांक २० जानेवारी रोजी 

उत्सवाच्या तिसऱ्या व अंतिम दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविकांच्या मनोरंजनासाठी 

 लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सायंकाळी ६ वाजता महाआरती पार पडणार असून त्यानंतर यात्रेची श्रीफळ वाढवून उत्तरपूजेने  व  पारंपरिक रीतिरिवाजांनुसार उत्सवाची सांगता होणार आहे.

गावकऱ्यांबरोबरच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री जननी माता आणि भैरवनाथाच्या कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदीराचे पुजारी, अनिल लोहार व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.