महाबळेश्वर येथील एम. ई. एस. स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : संदेश भिसे
येथील एम. ई. एस शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन महाबळेश्वर येथील आराम हॉटेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. स्नेहसमळेनाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली या वेळी सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमास पालक, शिक्षकवर्ग तसेच स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन, नाटिका, समूहगीत व सामाजिक संदेश देणाऱ्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या विविध प्रकारच्या पारंपरिक वेशभूषा उपस्थितांचे लक्ष्य वेधून घेत होत्या विद्यार्थ्यांच्या सादरी करणास प्रेक्षक पालक वर्गा कढून चांगलाच प्रतिसाद मिळाला
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष सुनील शिंदे या वेळी उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी एम. ई. एस. स्कूल गेली २५ वर्षे नगरपालिकेच्या सहकार्याने उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्य करत असल्याचे गौरवोद्गार काढले. तसेच या शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत शाळेस आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी वाई येथील कवी व व्यावसायिक अजित क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व विशद केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधत आत्मविश्वास, सातत्य आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व प्रेरणा निर्माण झाली.
या प्रसंगी गुणवंत व विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले.
या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून महाबळेश्वर नगराध्यक्ष सुनील शिंदे , अजित क्षिरसागर , नगरसेवक रोहित ढेबे , राजू इस्माईल नालबंद नगरसेविका विमलताई पार्टे, विद्या बावळेकर, संगीता वाडकर, स्मिता पाटील , प्रियंका वायदंडे, रेश्मा ढेबे उपस्थित होत्या. तसेच शाळेचे संस्थापक विश्वस्त किशोर कोमटी संजय दस्तुरे गणेश कोरे ब्रिजभूषण शर्मा दिलीप पाटील चिन्मय आगरकर शाळेच्या मुख्याध्यापिका शीला रशिया प्राथमिक इन्चार्ज पुष्पा गुजर उपस्थित होत्या तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका गौरी कामळे सुरेश कांबळे यांनी केले.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : राहुल शेलार
मो.नं : 9422604420
कार्यकारी संपादक : रियाज मुजावर
मो.नं : 9403546485



Social Plugin