Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

नासिर मुलाणी यांची महाबळेश्वर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी निवड*

 *नासिर मुलाणी यांची महाबळेश्वर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी निवड*                             


महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची पहिली सभा आज आयोजित करण्यात आली होती. या सभेत नगरसेवक नासिर मुलाणी  यांची सर्वानुमते बिनविरोध  उपनगराध्यक्ष पदी  निवड करण्यात आली. तसेच  स्वीकृत नगरसेवक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी नगराध्यक्ष किसन शिंदे तर महाबळेश्वर नगरविकास आघाडीच्या वतीने  सी .ए. मिलिंद ढेबे यांचीही निवड करण्यात आली आहे. 

महाबळेश्वर नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करुन अधिकृत घोषणा करण्यात आली.  ही सभा पिठासन अधिकारी नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली  पार  पडली.

उपनगराध्यक्ष श्री. नासीर भाई मुलाणी व स्वीकृत नगरसेवक श्री. किसन शिंदे व श्री. मिलिंद ढेबे यांचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

⬆️⬆️⬆️⬆️⬆️⬆️