महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी नासीर मुलाणी यांची प्रमुख दावेदारी
महाबळेश्वर प्रतिनिधी : ✍️
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ नगरसेवक नासीर मुलाणी यांची प्रमुख दावेदारी असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाबळेश्वर नगरपालिकेवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचा एकछत्री प्रभाव असून त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेतील सत्तास्थापना यशस्वी झाली आहे.
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक निवडून आले असून लोकनियुक्त नगराध्यक्षपदी सुनील शिंदे यांची निवड झाली आहे. या यशात मंत्री मकरंद पाटील यांचा सिंहाचा वाटा मानला जात असला, तरी या विजयामागे नगरसेवक नासीर मुलाणी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
नासीर मुलाणी यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची उमेदवारी माघार घेत मंत्री मकरंद पाटील यांच्यावरील आपली अढळ निष्ठा अधोरेखित केली. त्यांच्या या निर्णयामुळे महाबळेश्वर शहरात निष्ठेचे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
गेल्या २५ वर्षांपासून नासीर मुलाणी हे महाबळेश्वर नगरपालिकेत सातत्याने लोकनियुक्त नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. आपली संपूर्ण राजकीय कारकीर्द त्यांनी मंत्री मकरंद पाटील च्या मार्गदर्शनाखाली घडवली असून प्रत्येक टप्प्यावर पाटील यांना भक्कम साथ दिली आहे.
अलीकडील नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आणखी दोन नगरसेवक निवडून आणण्यात नासीर मुलाणी यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. तसेच मुस्लीम मतांचा मोठा गठ्ठा मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठीशी एकवटण्यातही त्यांचे योगदान निर्णायक ठरले आहे.
ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळख असलेले नासीरभाई मुलाणी यांचा मदतीचा स्वभाव, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आणि प्रशासकीय अनुभवाची हातोटी यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे.
मंत्री मकरंद पाटील उपनगराध्यक्ष पदाची जबाबदारी नासीरभाई मुलाणी यांच्यावर सोपवणार, यात आता केवळ औपचारिकता बाकी असल्याची चर्चा महाबळेश्वरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
संपर्क
संपादक : राहुल शेलार
मो.नं : 9422604420
कार्यकारी संपादक : रियाज मुजावर
मो.नं : 9403546485



Social Plugin