Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

 महाबळेश्वर येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

महाबळेश्वर टाईम्स 




महाबळेश्वर : संदेश भिसे ✍️

                                                                                          महाबळेश्वर शहरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या वतीने शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौक  येथे  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

     यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या वेळी तालुका प्रमुख गणेश उतेकर आणि शहरप्रमुख विजय नायडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले 

       या कार्यक्रमास महाबळेश्वर अर्बन बँकेचे व्हा. चेअरमन शरद बावळेकर सुभाष कारंडे शहर प्रमुख सचिन गुजर सचिन जेधे , सतीश ओंबळे, उस्मान भाई खारकंडे , राजेंद्र पंडित , सचिन ओतारी, अमित माळवदे माजी नगरसेविका विमलताई ओंबळे, तालुकाप्रमुख मेघा चोरगे, उपतालुकाप्रमुख (पूर्व) मंगल फळणे, उपतालुकाप्रमुख (पश्चिम) सोनाली बांदल, उपशहर प्रमुख आशा जाधव, उपशहर प्रमुख शितल वाईकर, विभाग प्रमुख प्रभाताई नायडू, ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मी मालुसरे, शिवसैनिक पूजा उतेकर, कविता साळुंखे, सुरेखा पंडित व अपूर्वा डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व उपस्थितांनी या थोर नेत्यांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.


                         बातम्या व जाहिरातीसाठी 

                                     संपर्क 

                         संपादक : राहुल शेलार 

                        मो.नं : 9422604420

                    कार्यकारी संपादक : रियाज मुजावर 

                       मो.नं :   9403546485