महाबळेश्वर टाईम्स जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नाकिंदा ता महाबळेश्वर येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
नाकिंदा गावामध्ये प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले, घोषणा देण्यात आल्या. शाळेतील बहुतांश मुलींनी सावित्रीबाई फुलेंचा पोशाख परिधान केला होता. सौ शाहिस्ता शेख मॅडम यांनी सर्वांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कु ओवेज डांगे याने केले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत उर्दू,हिंदी,मराठी व इंग्रजी भाषेत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये सावित्रीबाई फुलेंच्या उल्लेखनीय कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वसीम वारुणकर, सौ शाहिस्ता शेख व श्रीमती आसीया पटेल यांनी परिश्रम घेतले.शेवटी इयत्ता चौथीतील विद्यार्थी कु मूहिद डांगे याने सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.अश्या प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा नाकिंदा येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात व आनंददायी वातावरणामध्ये साजरी करण्यात आली.*










Social Plugin