महाबळेश्वरचे नगर परिषदेचे नगर सेवक रवींद्र कुंभादरे व माजी नगराध्यक्ष डी.एम. बावळेकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला सत्कार*
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रथमच कळम या चिन्हावर लढलेल्या रवींद्र कुंभारदरे यांच्या विजयाबद्दल त्यांचा व भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल डी.एम. बावळेकर यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात भारतीय जनता पार्टीकडून निवडूक लढवून विजयी झालेल्या सातारा जिल्ह्यातील नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या सत्कार समारंभास सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, मनोज घोरपडे, माजी आमदार मदन भोसले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाबळेश्वर नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रथम कमळ या चिन्हावर लढून श्री. कुंभारदरे हे विजयी झाले. तसेच डी.एम. बावळेकर यांनी नुकताच भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा जोमाने प्रचार करुन उमेदवारांना भरघोस मतांनी निवडणून आणण्याचा मनोदयही श्री. बावळेकर यांनी व्यक्त केला.
या सत्कार समारंभास महाबळेश्वर येथील उषाताई ओंबळे, विजय भिलारे, नंदकुमार बावळेकर, गोपाळ लालबेग, राजेंद्र पवार,सनी मोरे, ओंकार दिक्षित, चिन्मय आगरकर, अनिल केळगणे,बबन उतेकर,अमोल चोरमले, अनिल गायकवाड आदी उपस्थित होते.
बातम्या व जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : राहुल शेलार
मो.नं : 9422604420
कार्यकारी संपादक : रियाज मुजावर
मो.नं : 9403546485





Social Plugin