Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे ॲक्शन मोडवर शहराच्या स्वच्छतेसाठी सहकारी नगरसेवकांसह उतरले रस्त्यावर

 महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे ॲक्शन मोडवर

 शहराच्या स्वच्छतेसाठी सहकारी नगरसेवकांसह उतरले रस्त्यावर

महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर : प्रतिनिधी 


महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण  असून पयर्टनासाठी देश विदेशात प्रसिद्ध आहे महाबळेश्वर येथे  मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात मागिल काही दिवसापासून  येथील स्वच्छतेचे तीनतेरा वाजले असून यातून महाबळेश्वरचे नावलौकिक खराब होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महाबळेश्वर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सुनिल शिंदे अपल्या सहकारी नगरसेवकांसह  रस्त्यावर उतरले आहेत  नगरपालिका अधिकारी तसेच स्वच्छता  कर्मचाऱ्यांना सूचना देऊन  महाबळेश्वर शहर परिसर  स्वच्छ करण्याची मोहिम सुरु केली आहे. याची सुरुवात त्यांनी महाबळेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली



या  मोहिमेमध्ये  नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या समवेत नगरसेवक अफजल सुतार, ॲड संजय जंगम, संतोष शिंदे ,राहुल पिसाळ, रोहित ढेबे , नगरसेविका  विमलताई पारठे, संगीता वाडकर, रेश्मा ढेबे, पल्लवी कोंढाळकर ,प्रियांका वायदंडे यांच्यासह  नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते .


छत्रपती शिवाजी महाराज चौक महाबळेश्वर येथील एकमेव प्रशस्त असा चौक आहे. या चौकातच बंद पडलेली वाहने पार्कींग करुन ठेवण्यात आली आहेत. यामुळे पर्यटकांना वाहन पार्कींगसह अन्य सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.   तापोळ्याला जाणाऱ्या मार्गावरील हा महत्त्वाचा चौक आहे नगराध्यक्ष श्री. शिंदे यांच्या कारवाईमुळे चौकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे.


 या चौका लगत असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या भिंतीच्या बाजूला प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून या मुळे एके काळी शहराची शोभा वाढवणारा हा चौक बकाल झाला आहे . हा महत्वाचा चौक असल्याने या भागात वाहनांची चांगलीच वर्दळ असते अस्ताव्यस्त पार्किंगमुळे नेहमीच या चौकात प्रचंड वाहतुक कोंडीचा सामना करावा लागतो.   छत्रपती शिवाजी महाराज चौकात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे  बंद पडलेली वाहने तात्काळ हटवावीत. तसेच हा चौकाची रोजच्या रोज स्वच्छता करण्यात यावी अशा सूचनाही  नगराध्यक्ष श्री सुनिल शिंदे यांनी दिल्या नगरपरिषद स्वच्छता  कर्मचाऱ्या कडून कामात दिरंगाई  झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.  महाबळेश्वर शहराच्या  स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल  तसेच  स्वच्छ सुंदर हरित महाबळेश्वर चा नावलौकिक कायम राहील  या साठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.


                     बातम्या व जाहिरातीसाठी 

                                   संपर्क 

                          संपादक : राहुल शेलार 

                         मो.नं : 9765576377

                 कार्यकारी संपादक : रियाज मुजावर 

                        मो.नं :   9403546485