महाबळेश्वर मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर येथे उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला गिरिस्थान नगरपरिषद येथे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले सुभाषचंद्र बोस चौक येथे उपनगराध्यक्ष नासिर भाई मुलाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी नगरपरिषद हद्दीतील सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शासकीय कर्मचारी विद्यार्थी तसेच मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाबळेश्वर तहसीलदार कार्यालय येथे श्री सचिन मस्के , पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी श्री विजय विभुते यांच्या हस्ते , पोलीस मुख्यालयात पो.नि.श्री बापूसाहेब सांडभोर , वनविभाग महाबळेश्वर येथे वनक्षेत्रपाल तर महाबळेश्वर अर्बन बँक येथे अध्यक्ष समीर सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
महाबळेश्वर नगरपरिषद येथे नगराध्यक्ष श्री सुनील शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्या नंतर शालेय बँड पथकासोबत प्रभात फेरीस सुरुवात झाली ही प्रभात फेरी नगरपरिषद पासून सुभाष चौक मध्ये आली या वेळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले पुढे सुभाष चंद्र बोस व यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर विद्यार्थी शिक्षक नगरपरिषद कर्मचारी तसेच स्थानिक वर्ग यांच्या उपस्थितीत महाबळेश्वर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नासिर भाई मुलाणी यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस चौका मध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
या ध्वजारोहण सोहळ्या मध्ये सहभागी होण्या साठी येथील सुभाष चौकात अलोट गर्दी झाली होती .यानंतर मुख्य बाजार पेठ मार्गे शालेय विद्यार्थांची प्रभात फेरी येथील पोलीस परेड ग्राउंड येथे आली येथील पोलीस ग्राउंड येथे शालेय विद्यार्थ्यानं मार्फत मान्यवरांना मानवंदना देण्यात आली शिस्तबद्ध कवायत कार्यक्रम सादर करण्यात आले .
याच बरोबर महाबळेश्वर नगरपरिषद मार्फत प्रजासत्ताक दिना निमित्त येथील पोलीस परेड ग्राउंड येथे संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे


Social Plugin