महाबळेश्वर टाईम्स तेलगंणा येथे आयोजीत १६ व्या ज्युनिअर मिस्टर इंडिया मेन्स फिजिक शरीर शौष्ठव स्पर्धेमध्ये मसल फॅक्टरी महाबळेश्वर चा राहुल (करण) रमेश जाधव ठरला सुर्वण पदकाचा मानकरी
तेलंगणा बॉडी बिल्डर्स स्पोर्टस आसोशिएशन ( TBBPSA ) च्या वतीने तेलंगणा करिमनगर येथे 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी 16 वी ज्युनिअर फिजिक मध्ये महाबळेश्वर येथील मसल फॅक्टरीचे सदस्य राहुल (करण ) जाधव यांनी सुर्वण पदक व मिस्टर ज्युनिअर इंडिया2026 मेन्स टायटल विनर हा किताब पटकावला
या स्पर्धेत 15 राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धकांमध्ये मसल फॅक्टरी जिम महाबळेश्वर चा राहुल (करण) रमेश जाधव हा ठरला सुर्वण पदकाचा मानकरी
राहुल ( करण ) जाधवला मसल फॅक्टरी जिमचे प्रशिक्षक सुमित क्षिरसागर सर तसेच पंच राजेंद्र हेंद्रे , मुरली वत्स यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले





Social Plugin