महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर
महाबळेश्वर :-
महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या अध्यक्षपदी इस्माईल हुसेन मानकर (दादा मानकर) यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नव्या कार्यकारिणीची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.
उपाध्यक्षपदी नंदकुमार आनंदराव वायदंडे, तर इरफान मुस्तफा कुरेशी यांची जनरल सेक्रेटरीपदी निवड करण्यात आली आहे. सहसचिव म्हणून अंकुश रामचंद्र उफाळे यांची जबाबदारी सोपवण्यात आली असून कोषाध्यक्षपदी प्रवीण दत्तात्रय शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेच्या कार्यकारिणी सदस्यांमध्ये इमाम हसन नालबंद, नासीर आदम पन्हाळकर, अकील उमर पटेल, आझाद अकबर मुलाणी, रमेश शंकर आखाडे, राजेंद्र भिकन बावळेकर, मारुती नारायण डोईफोडे, जमीर मुबारक सुतार, रमेश वसंत बावळेकर तसेच सागर मारुती काळे यांचा समावेश आहे.
यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष, आप्पा भिलारे, माजी उपाध्यक्ष,अकिल पटेल, सेक्रेटरी सी.डी.बावळेकर, अंकुश नाना बावळेकर,धाकू ढेबे तसेच संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नव्या कार्यकारिणीकडून स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, पर्यटन हंगामात येणाऱ्या अडचणी सोडवणे, प्रशासनाशी समन्वय साधणे तसेच स्थानिक चालकांचे हित जपण्यासाठी संघटनेला अधिक बळकट करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकारिणी सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.


Social Plugin