मेटगुताड येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर (सातारा)
महाबळेश्वर तालुक्यातील मेटगुताड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) च्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
या उद्घाटनानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, आर पी आय पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक(बापू) गायकवाड व मिथुन तळवलकर यांच्या नेतृत्वाखालील RPI मध्ये पक्षप्रवेशानंतर हा कार्यक्रमही संपन्न झाला.
या सोहळ्याचे आयोजन जॉन जोसेफ यांच्या सहकार्याने करण्यात आला. कार्यक्रमास जॉन जोसेफ, पप्पू भोसले, विनय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सामाजिक न्याय, समानता आणि तळागाळातील घटकांच्या प्रश्नांसाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला या उपक्रमामुळे बळ मिळेल असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


Social Plugin