*महाबळेश्वर नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती व सदस्य निवडी संपन्न; राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व*
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर | प्रतिनिधी:✍️
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेची विषय समिती सदस्य नामनिर्देशन, सभापती निवड आणि स्थायी समिती रचना करण्यासाठीची विशेष सभा आज दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली. पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया राबवण्यात आली.
सभेची सुरुवात राज्यगीताने झाली. यावेळी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे गटनेते संजय बाळकृष्ण जंगम आणि गिरिस्थान नगरविकास आघाडीचे गटनेते कुमार गोरखनाथ शिंदे यांनी आपापल्या सदस्यांची नामनिर्देशन पत्रे सादर केली. छाननीनंतर पिठासीन अधिकाऱ्यांनी नवनियुक्त सभापती व सदस्यांची अधिकृत घोषणा केली.
शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती रोहित ढेबे पल्लवी संदीप कोंढाळकर,विद्या शरद बावळेकर,कुमार गोरखनाथ शिंदे सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी संजय बाळकृष्ण जंगम सदस्य म्हणून राहुल प्रकाश पिसाळ,प्रियंका अक्षय वायदंडे,निता आकाश झाडे.
पाणीपुरवठा आणि जलनिःस्सारण समितीच्या सभापती पदी उपनगराध्यक्ष नासीर युनूस मुलाणी, संतोष बबन शिंदे,संतोष मारुती आखाडे, राजु ईस्माईल नालबंद सदस्य पदी निवड करण्यात आली.
सार्वजनिक बांधकाम व नियोजन आणि विकास समिती सभापतीपदी अफझल मुबारक सुतार, संतोष मारुती आखाडे,विमल पांडुरंग पारठे,विमल पांडुरंग बिरामणे
महिला व बालकल्याण समिती सभापती पदी संगीता दत्तात्रय वाडकर सदस्य म्हणून विद्या शरद बावळेकर,रेश्मा किरण ढेबे,शबाना अल्ताफ मानकर.
स्थायी समिती सभापती नगराध्यक्ष पदसिद्ध सभापती सुनील लक्ष्मण शिंदे सदस्य म्हणून नासिर युनूस मुलाणी, संजय बाळकृष्ण जंगम, रोहित बबनराव ढेबे,अफझल मुबारक सुतार,संगीता दत्तात्रय वाडकर यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.








Social Plugin