Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वरच्या पाणी प्रश्नावर लवकरच विशेष बैठक; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांना आश्वासन

 महाबळेश्वरच्या पाणी प्रश्नावर लवकरच विशेष बैठक; मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद  पाटील यांचे महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांना आश्वासन

​महाबळेश्वर टाईम्स 

महाबळेश्वर(सातारा) ✍️



महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद आणि प्राधिकरण क्षेत्रातील प्रलंबित विविध विकासकामांसह, शहराला वारंवार भेडसावणाऱ्या पाण्याच्या समस्येबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री  मकरंद आबा पाटील यांची नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी भेट घेतली                                                       या वेळी संबंधित प्रश्नाबाबत सकारात्मक पाऊल उचलणार असून या संदर्भात लवकरच संबंधित विभागांची स्वतंत्र बैठक घेऊन ठोस निर्णय घेणार असल्याचे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिले. 


​महाबळेश्वरमधील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी नामदार मकरंद  पाटील यांची भेट घेऊन शहराच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने प्राधिकरणाच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा आणि त्यामध्ये वारंवार येणारे तांत्रिक अडथळे यावर चर्चा करण्यात आली.

​पाणी टंचाईवर कायमस्वरूपी तोडगा: प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजनेत येणाऱ्या अडचणींमुळे नागरिकांना आणि पर्यटकांना होणारा त्रास दूर करणे.

​नियोजित बैठक : संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक लावून धोरणात्मक निर्णय घेणे.

​प्रलंबित विकासकामे: महाबळेश्वरच्या पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विषयांवर चर्चा.

​"महाबळेश्वर हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून येथील नागरिकांना आणि पर्यटकांना मुलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. विशेषतः पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने बैठक घेऊन प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतले जातील, मदत व पुनर्वसन मंत्री श्री पाटील यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र राजपुरे तसेच महाबळेश्वर नगरीचे राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.



   बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क*

     

            संपादक :-  राहुल शेलार 

        

               📱  9765576377

   

कार्यकारी संपादक  :- रियाज मुजावर 

            

                 9403546 485