Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

लाडक्या नेत्याच्या आगमनाने शिवसैनिकांत उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरमध्ये थांबवून केली विचारपूस

 लाडक्या नेत्याच्या आगमनाने शिवसैनिकांत उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरमध्ये थांबवून केली विचारपूस

                 महाबळेश्वर टाईम्स 

​                महाबळेश्वर (प्रतिनिधी)

राज्याचे उपमुख्यमंत्री  आणि शिवसेना मुख्य नेते  एकनाथ शिंदे  यांचे आपल्या मूळ गावी, दरे (ता. महाबळेश्वर) येथे आगमन झाले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे महाबळेश्वर शहरावर असलेले प्रेम आणि शिवसैनिकांशी असलेली आपुलकी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. दरे गावी जाताना महाबळेश्वर शहरात शिवसैनिकांना पाहताच उपमुख्यमंत्र्यांनी आपला ताफा थांबवून सर्वांची आपुलकीने विचारपूस केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे.

​उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा जेव्हा आपल्या गावी येतात किंवा गावाहून परततात, तेव्हा ते न विसरता महाबळेश्वरमधील शिवसैनिकांच्या भेटीसाठी थांबतात. हीच परंपरा कायम राखत, यावेळीही त्यांनी गाडी थांबवून स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि भागातील कामांचा आढावा घेतला.

​यावेळी उपमुख्यमंत्री यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये ​तालुकाप्रमुख गणेश ऊत्तेकर, ​शहर प्रमुख विजयभाऊ नायडू

​, उपशहरप्रमुख सचिन गुजर, अल्पसंख्यांक शहरप्रमुख उस्मान खारखंडे, वैद्यकीय जिल्हा कक्ष प्रमुख राजू पंडित, शहर वैद्यकीय कक्ष प्रमुख गोविंदभाऊ कदम, महिला आघाडीच्या आशा जाधव, प्रभा नायडू, शितल ओतारी, सुरेखा पंडित, हर्ष साळुंखे, सचिन औतारी, असलम डांगे, राहुल साळुंखे, किरण मोरे, रमेश चौधरी, नाजीश खारखंडे आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

​"साहेब गावी आले की आम्हा शिवसैनिकांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारतो. राज्याचा गाडा हाकत असतानाही ते आपल्या माणसांना आणि आपल्या भागाला कधीच विसरत नाहीत, हेच त्यांच्या लोकप्रियतेचे गमक आहे. 

स्थानिक शिवसैनिक

​आपल्या लाडक्या नेत्याला इतक्या जवळून पाहून आणि त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे महाबळेश्वर शिवसेना शहर व तालुका शाखेच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

                              बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क

                                        संपादक :- राहुल शेलार 

                                           📱 9765576377

                                कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर 

                                          📱 9403546 485