Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

माझी वसुंधरा अभियान ४.० आणि ५.०' चा शानदार पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार मिळवत महाबळेश्वर नगरपरिषदेचा गौरव


माझी वसुंधरा अभियान ४.० आणि ५.०' चा शानदार पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार मिळवत महाबळेश्वर नगरपरिषदेचा गौरव

महाबळेश्वर टाईम्स


पुरस्कार स्विकारताना महाबळेश्वर चे नगराध्यक्ष सुनिल शिंदे व मुख्याधिकारी योगेश पाटील


पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या 'माझी वसुंधरा अभियान ४.०' (कालावधी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 ) आणि '५.०' (कालावधी 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 )चा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा वरळी येथील NSCI डोम येथे अत्यंत उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत मा.उपमुख्यमंत्री(राज्य उत्पादन शुल्क) सुनेत्रा ताई पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मा.पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती 


*राज्यस्तरावर 15 हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटात महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचा माझी वसुंधरा 4 व 5 मध्ये सलग 2 क्रमांक व भूमी घटका मध्ये प्रथम मानांकन असे एकूण  तीन  मानांकन  मिळालेबद्दल  महाराष्ट्राच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री मा.पंकजा ताई मुंडे यांच्या शुभहस्ते  महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा.सुनिल शिंदे, मुख्याधिकारी मा.योगेश पाटील,विभागप्रमुख प्रदीप बोरगे, कल्याण हिवरे व वैभव साळुंखे यांनी पुरस्कार स्वीकारला.* याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, आणि माझी वसुंधरा अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे यांनी या सोहळ्याचे नेटके नियोजन केले.



निसर्गाच्या पंचमहाभूतांचे जतन करण्याचा संदेश देत, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.

 * माझी वसुंधरा ४.० आणि ५.०: या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या शहरांचा आणि गावांचा सन्मान करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन, वृक्षारोपण आणि जलसंधारणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कृत करण्यात आले.