महाबळेश्वरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
महाबळेश्वर येथील 'श्री शिवजयंती उत्सव समिती'च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्त शहरातील विविध ठिकाणी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
सकाळी १२ वाजता छत्रपती शिवाजी चौक येथील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर गिरिस्थान नगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही हार घालण्यात आला. यासोबतच अंबिका नामदेव सोसायटी येथील शिवरायांच्या पुतळ्यास आणि कोळी आळी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समितीच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष अभिजीत कानडे, सचिव राहुल शेलार, खजिनदार शुभम कुंभारदरे यांच्यासह विजय नायडू, राजाभाऊ गुजर, संतोष साळुंखे, रामदास जाधव, गोविंद कदम, आकाश साळुंखे, प्रवीण जिमन, स्वरूप देवकर, ओंकार पवार, आनंद भांगडिया, विक्रम चोरगे आणि गौरव वाईकर यांसारखे अनेक शिवप्रेमी व मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण महाबळेश्वर शहरात या निमित्ताने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485



Social Plugin