Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर मध्ये डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियानाचे आयोजन*

 महाबळेश्वर मध्ये डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने महास्वच्छता अभियानाचे आयोजन* 



महाराष्ट्र न्यूज : राहुल शेलार 

महाबळेश्वर (सातारा)

 महाराष्ट्र भूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी महाबळेश्वर शहरात महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या महास्वच्छता अभियानामध्ये महाबळेश्वर शहर व परिसरातील नागरिकांनी तसेच सेवाभावी संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने  करण्यात आले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान कडून सातत्याने समाजपयोगी उपक्रम राज्यभर राबविले जातात.त्यात प्रामुख्याने वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर,दाखले वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप,अंध व मुकबधीर विद्यार्थ्यांना मदत, उद्योजकता व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिर, पाणपोई, बस थांबे, अपघातग्रस्तांना मदत, या सारखे अनेक उपक्रम महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविले जातात. रविवार दि. १ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजता महाबळेश्वर शहरात विविध ठिकाणी तसेच शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पदमश्री डॉ श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे. या स्वच्छता अभियानामध्ये महाबळेश्वर शहर व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी व संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.