महाबळेश्वर: विल्सन पॉईंटवर वन्यजीवांचा मुक्त संचार; पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर : प्रतिनिधी
पर्यटनाचे नंदनवन मानल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमधील सर्वात उंच ठिकाण म्हणजेच विल्सन पॉईंट (सनराईज पॉईंट) सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्या आणि गव्यांचा मुक्त संचार वाढल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
सूर्योदय पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना गव्यांच्या कळपाचा सामना करावा लागत आहे.
बिबट्याची दहशत: स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, विल्सन पॉईंटच्या पायथ्याशी असलेल्या परिसरात बिबट्याचा वावरही वाढला आहे.
वन विभागाचा इशारा: वन्यजीवांच्या या मुक्त संचारामुळे वन विभागाने या परिसरात सावधगिरीने वावरण्याचे आवाहन केले आहे.
प्रशासनाचे आवाहन वन विभागाने पर्यटकांना सूचना केली आहे की, विल्सन पॉईंट परिसरात जाताना एकटे जाऊ नये. तसेच, वन्यप्राणी समोर आल्यास त्यांना हटकण्याचा किंवा फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी या भागात गस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरत आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin