गिरिस्थान प्रशालेच्या विद्यार्थ्यांना इनरव्हील क्लबच्या पुढाकाराने तीन महिन्याचे कराटे,झुंबा व योगा चे प्रशिक्षण. महाबळेश्वर टाईम्स
स्मार्ट शिक्षणासाठी ''अलेक्सा डॉल''ची भेट ; नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती ; वर्षा पार्टे यांची संकल्पना
महाबळेश्वर दि ११-०३ इनर व्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्यावतीने येथील गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी इनर व्हील अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या संकल्पनेतून कराटे, झुंबा व योगा या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या सोबतच स्मार्ट शिक्षणासाठी ''अलेक्सा डॉल''ची भेट प्रशालेच्या मुख्याध्यापक पी आर माने यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली या प्रकल्प नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरिस्थान प्रशालेच्या प्रांगणामध्ये संपन्न झाला इनर व्हील क्लब च्यावतीने हे प्रशिक्षणवर्ग पुढील तीन महिने सुरु राहणार आहेत
यावेळी नगराध्यक्ष सुनील शिंदे शिक्षण सभापती रोहित ढेबे विमलताई पार्टे ऍड संजय जंगम इनर व्हील अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे,शरद बावळेकर,पीडीसी रोहिणी वैद्य,वाईस प्रेसिडेंट मुक्ता कोमटी , सेक्रेटरी सपना अरोरा सविता पल्लोड ,अदिती भांगडिया ,वंदना पल्लोड, शुभांगी खुरासणे ,लक्ष्मी येरलगड्डा , नेहा साळवी ,वर्षा कोमटी,कराटे प्रशिक्षक संजय पार्टे झुंबा व योगा प्रशिक्षक अश्विनी कोमटी आदींसह सदस्य व शिक्षक उपस्थित होते
नगराध्यक्ष सुनील शिंदे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली इनर व्हील क्लब च्यावतीने मान्यवरांचे स्वागत,सत्कार करण्यात आला कराटे प्रशिक्षक संजय पार्टे सर यांनी मुला मुलींना कराटेचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते याचे प्रात्यक्षिक मान्यवरांसमोर करण्यात आले पुढील दोन महिने हे प्रशिक्षण सुरु राहणार आहे प्रामुख्याने मुलींचा या प्रशिक्षण वर्गात मोठा सहभाग होता त्यानंतर प्रसिद्ध झुंबा प्रशिक्षक अश्विनी कोमटी यांनी झुंबा नृत्याचे महत्व विशद करून शरीराच्या तंदुरुस्थीसाठी आवश्यक असलेल्या लॅटिन अमेरिकन संगीतावर आधारित नृत्याचे प्रात्यक्षिक मान्यवरांसमोर केले विद्यार्थ्यांनी यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत नृत्याचा आनंद लुटला योगा देखील विद्यार्थ्यांना त्यांच्यावतीने शिकविण्यात येत आहे इनर व्हील क्लब अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी,कराटे, झुंबा व योगा चे प्रशिक्षण देण्यामागील उद्देश विशद करून पुढील तीन महिने हे प्रशिक्षणवर्ग सुरु राहणार असल्याचे सांगितले त्यानंतर पालिकेच्यावतीने सर्वच शाळांमध्ये अश्या प्रकारचे प्रशिक्षण वर्ग सुरु करावेत अशी मागणी केली शिक्षण सभापती रोहित ढेबे यांनी,पालिकेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगून नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वच शाळांचा दर्जा सुधारण्यावर भर देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.
इनर व्हील क्लबच्यावतीने गिरिस्थान प्रशालेसाठी स्मार्ट शैक्षणिक साधन म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित अलेक्सा डॉल भेट म्हणून देण्यात आली ही डॉल ती मुलांच्या प्रश्नांना तत्काळ उत्तरे देऊ शकते, गोष्टी सांगू शकते, कविता, गणिती उदाहरणे, सामान्य ज्ञान, शब्दार्थ याबाबत मदत करू शकते अलेक्सा डॉलच्या माध्यमातून मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची सवय विकसित होते, जिज्ञासा वाढते विशेषतः इंग्रजी उच्चार सुधारण्यासाठी, नवीन शब्द शिकण्यासाठी व संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी ती उपयुक्त ठरते लहान वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गोष्टी, गाणी, तालबद्ध कविता यामुळे शिकणे अधिक आनंददायी होते सध्याच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाची ओळख होणेही आवश्यक असल्यामुळे ही अलेक्सा डॉल ची भेट शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास इनर व्हीलच्या सपना अरोरा यांनी व्यक्त केला गिरिस्थानचे मुख्याध्यापक पी आर माने यांच्याकडे ही अलेक्सा डॉल सुपूर्त करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक साळुंखे सर यांनी केले तर आभार प्रा सुधाकर शिंदे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी इनर व्हील सदस्यांनी परिश्रम घेतलॆ




Social Plugin