Type Here to Get Search Results !

Mahabaleshwar Times

Mahabaleshwar Times

महाबळेश्वर ''रोटरी कलब "च्या वतीने ग्रामीण रुग्णालयास शीत शवपेटी प्रदान

 महाबळेश्वर ''रोटरी क्लब''च्या वतीने ग्रामीण रुग्णालयास शीत शवपेटी प्रदान



              महाबळेश्वर येथे   सेवा कार्यात कायमच अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरच्यावतीने बेल एअर संचालित ग्रामीण रुग्णालयास शीत शवपेटी प्रदान करण्यात आली मागील आठवड्यातील सर्वसामान्य घरातील एका वृद्धचा मृत्यू झाला होता नातेवाईकांना यायला वेळ लागणार असल्यामुळे या शीत शवपेटी मध्ये सलग ३५ तास मृतदेह ठेवण्यात आला नातेवाईकांना यामुळे दिलासा मिळाला

                             पुढील काही दिवसात या शितपेटीच्या देखभालीचा भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वरच्यावतीने लवकरच व्होल्टेज स्टॅबिलायझर  देखील बसविण्यात येणार आहे.

                 समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचावी व व्यक्तीच्या निधनानंतरही त्यांना सन्मानाने निरोप मिळावा हा उद्दात हेतू असून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, की त्याचे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह ठेवावा लागतो कुटुंबीय व नातेवाईक परराज्यात किंवा लांब पल्ल्याच्या ठिकाणी असतात ते पोहचेपर्यंत मृतदेहाची हेळसांड होते त्यामुळे शीत शवपेटी गरजेचे व अत्यावश्यक होती रोटरी क्लब ऑफ महाबळेश्वर साठी रोटरी प्रांत ३१३२ चे २०२४-२५ चे‌ प्रांतपाल रो डॉ सुरेशजी साबू यांच्या संकल्पना व पुढाकारातून रोटरी प्रांत ३१३२ मध्ये कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वा मधून हा प्रकल्पामुळे यशस्वी झाला त्यामुळेच महाबळेश्वर तालुक्यास ही अत्याधुनिक शवपेटी उपलब्ध झाली आहे.

                          महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयास ही शीत शवपेटी प्रदान करण्यात आली असून याचा उपयोग होऊ लागला आहे रोटरीचे माजी अध्यक्ष रो दिनेश भिसे यांनी,या शीत शवपेटीच्या उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली या शीत शवपेटीच्या लोकार्पणास रोटरी क्लब महाबळेश्वरचे अध्यक्ष रो विजय काळे माजी अध्यक्ष रो दिनेश भिसे स्वाती भांगडिया,रमेश पल्लोड,अनंतकुमार कोमटी,मोनाली शिर्के-वाघ शिरीष गांधी,ब्रिजभूषण सिंह,महेश कोमटी,दिलीप रिंगे रोटरी सदस्यांसह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ पंडित देशमुख,कार्यालयीन अधीक्षक बाजीराव आंब्राळे आदी उपस्थित होते.


काही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले होते मी परराज्यात असल्यामुळे मला यायला वेळ लागणार होता मात्र रोटरीच्यावतीने ग्रामीण रुग्णलयास देण्यात आलेल्या शवपेटीचा माझ्या वडिलांचा मृतदेह ठेवण्यासाठी उपयोग झाला.- शंतनू बागडे,महाबळेश्वर