मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले , मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा)पाटील व महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक: सुरूर-वाई रस्ता ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार;
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांची दुरवस्था आणि प्रलंबित कामांबाबत काल दि ११ / ३/ २०२५ रोजी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सुरूर-पोलादपूर रस्त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.
*महत्त्वाचे निर्णय आणि आश्वासने:*
सुरूर ते वाई रस्ता: या मार्गावरील प्रलंबित काम ३० एप्रिल २०२६ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दोन्ही मंत्र्यांना दिले आहे. यामुळे पर्यटकांचा आणि स्थानिक नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
महाबळेश्वर-पाचगणी रस्ता: महाबळेश्वर आणि पाचगणी शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नगराध्यक्षांनी मांडलेल्या व्यथेची दखल घेत, या मार्गावरील सर्व पॅचवर्क (खड्डे भरण्याचे काम) तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीस योग्य करण्याचे निर्देश देण्यात आले. ठेकेदाराने हे काम तातडीने पूर्ण करण्याचे मान्य केले आहे.
लोकप्रतिनिधींनी मांडली बाजू:
बैठकी दरम्यान महाबळेश्वरचे नगराध्यक्ष श्री. सुनील दादा शिंदे आणि पाचगणीचे नगराध्यक्ष श्री. दिलीप बगाडे यांनी रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे पर्यटनावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले. रस्ते तातडीने दुरुस्त न झाल्यास नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, ही बाब त्यांनी प्रकर्षाने मांडली.
या बैठकीला महाबळेश्वर नगरसेवक ॲड संजय जंगम , नगरसेवक रोहित ढेबे आणि पाचगणी नगरपरिषदेचे नगरसेवक, दोन्ही शहरांचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित प्रकल्पाचे ठेकेदार उपस्थित होते.



Social Plugin