महाबळेश्वर–तपोळा रोडवर कचरा डेपो जवळील वणवा वनकर्मचाऱ्यांनी आटोक्यात आणला
महाबळेश्वर टाईम्स
महाबळेश्वर (संदेश भिसे)
महाबळेश्वर–तपोळा मार्गावरील कचरा डेपो नजीक रस्त्यालगत अचानक वणवा लागल्याची घटना घडली. येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी ही बाब लक्षात येताच सह्याद्री प्रोटेक्टर्सच्या सभासदांना माहिती दिली.
या जवानांकडून वनपाल सुनील लांडगे यांना कळविण्यात आले. माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक लहू राहुत तसेच वनमजूर संतोष काळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तत्परतेने प्रयत्न करून लागलेला वणवा आटोक्यात आणला.
वेळीच वणवा नियंत्रणात आल्यामुळे मोठे नुकसान टळले. सध्या परिसरात वणव्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी कुठेही धूर किंवा आग दिसल्यास तात्काळ वनविभागाला कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या व जाहिराती साठी 📰 संपर्क
संपादक :- राहुल शेलार
📱 9765576377
कार्यकारी संपादक :- रियाज मुजावर
📱 9403546 485


Social Plugin